टीम मंगळवेढा टाईम्स।
मार्केटमध्ये उभा असून मला अर्जंट मार्केटमध्ये काही पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे अर्जंट पैसे पाठवा, एका अनोळखी व्यक्तीने फोनवरून स्कॅनरवर पाठवले आणि अंगणवाडी सेविकेने त्या स्कॅनरवरून ४० हजार रुपये अंगणवाडी सेविकेने स्वतःची फसगत करून घेतली.
बोलणारा कोणीतरी नातेवाईक असल्याचा भास झाल्याने तिने स्कॅनरवर तब्बल चाळीस हजार रुपये पाठवले.
याबाबत अंगणवाडी सेविका उमा प्रमोद नलवडे (वय ३६, रा जगदाळे नगर , भोसरे, कुर्डुवाडी ) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
कुर्डुवाडी येथील बायपास नजीक भोसरे हद्दीतील जगदाळे नगरमध्ये फिर्यादी उमा नलवडे राहातात. त्या सकाळी शाळेला जाण्यासाठी गडबडीत निघाल्या.
यावेळी त्यांना एका अनोळख्या व्यक्तीचा फोन आला. यावेळी मला अर्जंट पैसे पाठवा, मी मार्केटमध्ये उभा असून मला समोरच्याला पैसे द्यायचे आहेत.
तुम्हाला दुपारी पैसे माघारी फोनवरून पाठवितो म्हणाला. या संवादावरून अंगणवाडी सेविकेला आपला कोणीतरी नातेवाईकच बोलत आहे असा भास झाला.
त्यामुळे त्यांनी त्यांनी पाठविलेल्या स्कॅनरवर लागलीच पैसे पाठविले. पहिल्यांदा पाच हजार पाठविले, पुन्हा पाच व पुन्हा तीस असे एकूण चाळीस हजार रुपये पाठविले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज