टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सोपी, पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
कोरोनाकाळात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. आता ऑनलाइन प्रणालीमुळे शिक्षकांच्या बदल्यांना गती मिळेल. ही प्रक्रिया २१ जूनपासून सुरू होणार आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने ऑनलाइन प्रणाली विकसित केली. २०२२ मधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
बदलीच्या प्रक्रियेत कोणत्या सुधारणा कराव्या याकरिता शासनाने मागील वर्षीच बदलीस बदली अभ्यासगट नेमला होता.
या अभ्यास गटाने विविध राज्यांतील प्रक्रियेचा अभ्यास करून तसेच महाराष्ट्रातील शिक्षक नेत्यांशी चर्चा करून शासनाला बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच राबविण्याची शिफारस केली.
मात्र , कोरोनामुळे गेल्या दोन शैक्षणिक सत्रांत बदली प्रक्रिया रखडली होती. आता मात्र बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बदलीस पात्र कोण ?
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेत नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
या आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्याची किमान पाच वर्षे सलग सेवा झालेली असणे गरजेचे आहे. लकवा, दिव्यांग कर्मचारी , शस्त्रक्रिया झालेले , विधवा , कुमारिका शिक्षक , परित्यक्त्ता तसेच वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी त्याचबरोबर पती पत्नी एकत्रीकरण आदींचा विशेष संवर्ग शिक्षकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.(स्रोत:लोकमत)
शिफारसींना ब्रेक
■ऑनलाइन पद्धतीमुळे कुणालाही बदलीसाठी हस्तक्षेप करता येणार नाही..
■ ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने पारदर्शक पद्धतीने बदल्यांची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे विविध प्रकारच्या शिफारसींना ब्रेक लागेल.
एका शिक्षकाला ३० शाळांचा पर्याय
बदलीस पात्र शिक्षकांना ३० शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी सहा टप्पे ठरविण्यात आले असून, कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
या बदल्यांबाबत अनियमिततेची तक्रार आल्यास त्याचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
प्रणालीची वैशिष्ट्ये
■ संगणक तथा मोबाईलवर सहज वापरता येते.
■ मोबाईल नंबरने लॉगीन करता येते. प्रत्येक वेळी स्वतंत्र ओटीपी येतो, ओटीपीमुळे सुरक्षितता अधिक आहे.
■ प्रत्येक सूचना वेळोवेळी इ-मेल व एसएमएसद्वारे मिळेल.
■ कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते . त्यामुळे अधिक सुरक्षितता आहे.
■ या प्रणालीमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडली की त्या संदर्भात पीडीएफ संबंधिताच्या मेलवर प्राप्त होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज