टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरालगत असलेल्या रामकृष्ण नगर येथे भर दिवसा चोरटयांनी घराची कडी कोयंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याने दागिने व रोख रक्कम असा १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
दरम्यान, भर दिवसा चोरटयांनी चोरी केल्यामुळे मंगळवेढा शहरात एकच खळबळ उडाली असून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी कुसूम सुभाष मोरे ह्या रामकृष्ण नगरमध्ये रहात असून सकाळी १०.०० वा. त्या नातवंडांना प्रायमा शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या.
तर त्यांचे पती सुभाष हे घराला कुलूप लावून देवदर्शनासाठी गेले होते. फिर्यादी ह्या मुलांना शाळेत सोडून ११.०० वा. घरी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले.
तदनंतर त्यांनी मुलगा नितीन यास फोन करून घटनेची हकिकत सांगितली. फिर्यादी व त्यांचा मुलगा, सून यांनी घरात जावून पाहणी केली असता बेडरूममधील कपाट उघडलेले दिसले, त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.
चोरट्यांनी कपाटात ठेवलेले ८० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट, २० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे कानातील झुबे,
२० हजार रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाची पिळयाची अंगठी, १० हजार रुपये किमतीचे अडीच ग्रॅम वजनाच्या दोन लेडीज अंगडया, १२ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे कानातील फुले,
५ हजार रुपये किमतीची चांदीची वाटी, करंडे, पैंजण , ब्रासलेट व रोख एक हजार रुपये असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेलेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, ही चोरीची घटना भर दिवसा झाल्यामुळे शहर परिसरातील नागरिक धास्तावले असून भर दिवसा चोरट्यांनी चोरी केल्याने या चोरीचा तपास करणे पोलिसांना एक आव्हान ठरले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज