टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारात मोबाईल चोरी करणाऱ्या कोल्हापूरातील अल्पवयीन मुलास बाजारकरुनेच रंगेहाथ पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.
आठवडा बाजारातील गर्दी फायदयाचा लाभ घेण्यासाठी चोरीसाठी लहान मुलांचा वापर करत असल्याचे सामोरे आले.या प्रकरणात पोलीसांनी कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
मंगळवेढा शहरातील आठवडा बाजारासाठी पंढरपूर मंगळवेढा सांगोला परिसरातील व्यापारी व खरेदीदार येत असल्याने नेमक्या या गर्दीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने मोबाईल चोरी करण्यासाठी
लहान मुलाचा वापर केला जात असून काल सौरभ येलपले रा येड्राव यांचा मोबाईल आज दि.13 रोजी दु.3.30 वा भाजीपाला खरेदी करत असताना
चोरीस गेला त्यानंतर काही वेळात रितेश बाबासाहेब पाटील आंबेचिंचोली यांचाही मोबाईल चोरीस गेला कपिल सुरेश पाटील, रा.आकोले यांचा मोबाईल चोरी करत असताना त्यांने चोरटयास रंगेहाथ पकडले.
दरम्यान प्राथमिक शिक्षक कविराज दत्तू यांचा चोरलेला मोबाईल त्या अल्पवयीन मुलाकडे आढळून आला मात्र कपिल पाटील यांचा मोबाईल त्याने त्यांच्या मित्राकडे दिल्याचे सांगीतले.
यावरुन आठवडा बाजारात चोरीच्या घटनेसाठी परजिल्हयातील लहान मुलाचा वापर होत असल्याचे दिसून आले. प्रत्येक सोमवारी चोरीच्या घटना घडत असतात नागरिकाकडून फिर्याद देण्यास टाळले जाते.
मात्र आजच्या बाजारात चोरटयाचा उपद्रव जास्तच झाला. यामागील मास्टरमाईडचा पोलीसांनी शोध घेणे गरजेचे आहे.
आठवडा बाजारातील गर्दीचा लाभ घेण्यासाठी किती अल्पवयीन बालके यामध्ये टोळीच्या रूपाने सक्रिय केली याचा देखील पोलिसांनी शोध घेण्याची आवश्यकता आहे.
भाजीपाला खरेदीसाठी प्रत्येक सोमवारी मोठी गर्दी असते या गर्दीचा लाभ घेण्याचा प्रयत्न चोरटयाकडून वारंवार होत आहे. रस्त्यावर बेशिस्त पणे वाहने लावली जात असून त्याकडे वाहतूकीला अडथळा होत आहे.
नगरपलिकेच्या व्यापारी गाळयातील व्यापाऱ्यांच्या खरेदी व विक्रीस मोठा अडथळा होत आहे मोबाईल चोरीप्रकरणावरुन भविष्यात वाहने देखील चोरीस जाण्याची शक्यता पालिकेने वाहनतळ पोलीसांनी आठवडा बाजारी गस्त घालण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामीण भागातून येणाय्रा ग्राहकातून बोलले जात आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज