टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढासह सोलापूर जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित केला आहे.
आज दुपारी 12 वाजता नगरपरिषदच्या कार्यालयात सोडत होणार आहे. तसेच मंगळवेढा नगरपालिकेने नागरिकांना सोडत ऑनलाईन पाहता यावी यासाठी FB Live च्या माध्यमातून Mangalwedha nagarparishad या अकाउंट व www.mangalwedhamc.org या वेबसाईटवर.
तसेच Mangalwedha nagarparishad या युट्यूब चॅनलवर याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार असल्याचे विनायक साळुंखे यांनी सांगितले आहे.
११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी आज सोमवारी त्या त्या नगरपरिषदांच्या/नगरपंचायतीच्या कार्यालयात मुख्याधिकारी आरक्षण सोडत काढणार आहेत.
आपला बिझनेस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात पोहोचवा.
आजच करा संपर्क : 9970 76 6262
या सोडतीत अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
आज १३ जूनला आरक्षण सोडत काढल्यानंतर त्यावर १५ ते २१ जून दरम्यान हरकती स्वीकारल्या जाणार आहेत.
२४ जूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आरक्षण व सोडतीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
विभागीय आयुक्तांकडून २९ जूनपर्यंत आरक्षणास मान्यता मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून १ जुलैपर्यंत अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर केले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, सांगोला, कुर्डूवाडी, करमाळा, मोहोळ, दुधनी, मैंदर्गी, मंगळवेढा या ११ नगरपरिषदांसाठी व अनगर नगरपंचायतींसाठी ही आरक्षण सोडत प्रक्रिया राबविली जाणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकांची सध्या प्रारूप प्रभाग रचना झालेली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तयारीपेक्षा नगरपरिषदांची प्रक्रिया आघाडीवर आहे.
त्यामुळे जिल्ह्यात झेडपीच्या अगोदर नगरपरिषदांच्या निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे.
अकलूज ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरिषदेत झाले आहे. अकलूजमधून आता २६ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
अनगर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले असून येथून १७ नगरसेवक निवडले जाणार आहे. चार नगरपरिषदांमध्ये या दोन्ही ठिकाणी नागरी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे.
बार्शी नगरपरिषदेतून ४२, पंढरपूरमधून ३६, अक्कलकोटमधून २५, सांगोल्यातून २३ नगरसेवक निवडले जाणार आहेत.
करमाळा, कुर्डूवाडी, मंगळवेढा, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ या सहा नगरपरिषदांमधून प्रत्येकी वीस नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
प्रभाग रचना अंतीम झाली असून आता नगरपरिषदांसाठी आज प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. प्रभाग आरक्षणानंतर कोणत्या प्रभागातून कोणाविरुध्द कोण लढणार हे जवळपास चित्र स्पष्ट होत असल्याने निवडणुक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज