mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! ‘ऑनलाइन बझार’चा सात हजार ग्राहकांना गंडा; न पटणाऱ्या ऑफर्स देऊन सुपर सेलचे नावाने कोट्यवधींचा घोटाळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 12, 2022
in क्राईम, राज्य
सावधान! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय; तुमची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग सज्ज

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ऑनलाइन ऑर्डर्स घेणाऱ्या सांगलीजवळच्या बझारकडे मालासाठी आगाऊ बुकिंग केलेल्या ग्राहकांत फसवणुकीची भावना आहे.ठरलेल्या वेळेत माल घरपोहोच मिळत नसल्याने गुंतविलेले पैसे पणाला लागले आहेत. १ मेपासून एकाही ग्राहकाची ऑर्डर बझारने घेतलेली नाही.

व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत ग्राहकांचा राग अनावर झाला.

अनेक ग्राहकांनी प्रतिक्रिया व तक्रारींचा पाऊस पाडला. ऑनलाइन ॲपद्वारे बुकिंगनंतर बाजारभावापेक्षा स्वस्तात माल घरपोहोच देण्याची योजना बझारने जाहीर केली होती.

ग्राहकांनी प्ले स्टोअरवरून २९ हजार वेळा ॲप डाऊनलोड केले आहे. त्यावरून ग्राहकांच्या ऑर्डर्स एप्रिलअखेरपर्यंत घेण्यात आल्या. १ मेपासून बंद करण्यात आल्या.

आपला बिझनेस संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात पोहोचवा.

आजच करा संपर्क : 9970 76 6262

बझारचा ग्राहकांशी संपर्क तुटल्याने आणीबाणीची स्थिती उद्भवली. सध्या तो कुलूपबंद आहे. कॉल सेंटरवर संपर्क होत नाही.

काही ग्राहकांनी व्यवस्थापनाच्या मोबाइलवरही संपर्क केला; पण संवाद होत नसल्याने अस्वस्थता, घबराट आणि फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे.

एप्रिलमध्ये बझारबाहेर माहिती देण्यासाठी काही कर्मचारी नेमण्यात आले; पण त्यांच्यावर हल्ले करण्यापर्यंत ग्राहकांचा राग अनावर झाला. रमजान ईदच्या काळात मिरजेतून खूपच मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स थेट बझारमध्ये आल्या, त्या पूर्ण करताना ऑनलाइन डिलिव्हरीचा मात्र फज्जा उडाला.

खूपच स्वस्तात माल मिळू लागल्याने काही किराणा दुकानदारांनीही वेगवेगळ्या नावांनी ऑर्डर्स नोंदविल्या, त्यामुळेही डिलिव्हरीची यंत्रणा कोलमडली. ॲपवरून मागणी नोंदविलेल्या ग्राहकांना माल निर्धारित वेळेत मिळालाच नाही.

ग्राहकांच्या प्रचंड मागणीला तोंड देण्याइतपत बझारची तयारी नसल्याने सगळाच बाजार झाला.

यासंदर्भात व्यवस्थापनाने दावा केला की, सद्य:स्थितीला फक्त ३५० ग्राहकांच्या १ हजार १०० ऑर्डर्स घरपोहोच देणे बाकी आहे. ग्राहकांशी संवाद तुटल्याने ही स्थिती निर्माण झाली.

बझारच्या सर्व व्यवहारांची माहिती आम्ही स्वत:च संजयनगर पोलिसांत दिली आहे. कोणाचीही फसवणूक केली जाणार नाही. बझार पुुन्हा सुरू केला जाईल.(स्रोत; लोकमत)

सगळाच अनागोंदी कारभार

बझारचा खूपच मोठा गाजावाजा झाल्याने ग्राहकांचा प्रचंड ताण बझारवर आला, तो पेलण्याइतपत तयारी व्यवस्थापनाने केली नव्हती. मेल व कॉल सेंटरवरून प्रतिसाद, मागणीनुसार वेळेत पुरवठा,

बझारच्या जागेचा विस्तार, ग्राहकांशी संवाद या सर्वच बाबतीत अनागोंदीची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऑनलाईन बझार

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, उपोषण सोडलं; सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री काय घडलं?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
Next Post
संधी! 10वी,12वी उत्तीर्ण धारकांना मोठ्या कंपनीत नोकरीची संधी, मंगळवेढ्यात विविध पदासाठी होणार मोठी भरती; येथे करा अर्ज

Job update! मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेत होणार आहे शिक्षक भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड; आताच करा अप्लाय

ताज्या बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा