टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली असून , योजनेला सोलापुरात तीव्र विरोध होत आहे.
योजनेमुळे शिवेसना पक्षाची सोलापुरात बदनामी होत आहे. त्यामुळे ही योजना रद्द करा, अशी मागणी मोहोळ तालुक्यातील शिवसेनेचे नेते सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
क्षीरसागर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने याप्रकरणी चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यात आष्टी, शिरापूर, सीना, माढा, एकरूख मंगळवेढा, सांगोला, तसेच दहिगाव उपसा सिंचन योजना रखडल्या आहेत. असे असताना पालकमंत्री भरणे यांच्या पुढाकारातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली आहे.
त्यामुळे उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यात जाणार आहे. योजनेसाठी ३४८ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यात जनआक्रोश उसळला असून, याचा फटका नियोजित जिल्हा परिषद, नगर परिषदा तसेच महापालिका निवडणुकीत बसणार आहे.
यात शिवसेना पक्षाचीदेखील बदनामी होत आहे. हे पक्षाच्या दृष्टीने घातक असून, याप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी लक्ष देऊन योजना तत्काळ रद्द करावी , असे क्षीरसागर यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
क्षीरसागर यांच्या निवेदनानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिल्यामुळे पुन्हा एकदा योजनेबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज