टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील श्री.ज्योर्तिलिंग ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था शाखा मंगळवेढाचे चेअरमन गोरख दामोदर गोडगे यांनी ठेवीदाराच्या ठेवी पोटी रु. सात लाखाचा चेक देवून फसवणुक केल्याप्रकरणी मंगळवेढयाचे न्यायाधिश नडदगल्ली यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
यात चेअरमन गोडगे तर्फे ॲड.धनंजय हजारे व ॲड. सीमा ढावरे यांनी काम पाहिले.
या खटल्याची हकीकत अशी की, मंगळवेढा येथे ज्योर्तिलिंग पतसंस्था करमाळा याची शाखा सुरु करण्यात आली. त्या पतसंस्थेत अनेक जनांनी मुदत ठेवी एजंट मार्फत ठेवी ठेवण्यात आल्या होत्या.
परंतू सदर पतसंस्था अचानक बंद झाल्याने ठेवीदार व एजंट पैशासाठी पतसंस्थाचे चेअरमन गोडगे यांच्याकडे पैशाची मागणी करू लागली.
त्यात पतसंस्थेत काम करणारा राजेंद्र पांडूरंग कोंडूभैरी रा.मंगळवेढा , जि.सोलापूर यांच्याकडे ठेवीदाराच्या ठेवी पोटी रु . सात लाख चा दि १८/०१/२०१० रोजी चेक दिला.
परंतू सदर चेक वटला नाही म्हणून सदर कोंडूभैरी यांची चेअरमन गोडगे यांनी फसवणूक केली म्हणून कोर्टात केस दाखल केली. त्यावर कोर्टानी चेअरमन गोडगे यांचेविरुद्ध केस दाखल करुन खटला सुरु झाला.
या खटल्यात ठेवीदार व फिर्यादी यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . त्यावेळी चेअरमन गोडगे यांच्यामार्फत ॲड. धनंजय हजारे यांनी आपला युक्तीवादात सदर दिलेला चेक याचा गैरवापर करुन खोटी केस दाखल केली आहे.
वास्तविक कोंडूभैरी यांचे केवळ चार हजार येणे असताना त्यांनी सात लाख देणेचा प्रश्नच उद्भवत नाही . कारण फिर्यादी कोंडूभैरी यांनी स्वत : च्या नावावर चेक दिला अशी फिर्याद आहे.
त्यासाठी फिर्यादी यांनी सात लाख रुपये चेअरमन गोडगे देणे आहे हे शाबीत केले नाही. त्यामुळे सदर गोडगे यांनी चेक दिला हे शाबीत होवू शकत नाही.
त्यासाठी उच्च न्यायालयाचे दाखले हजर केले या सर्व बाबींचा व युक्तीवाद ग्राह्य मानून चेअरमन गोडगे यांची निर्दोष मुक्तता केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज