टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथून एका १४ वर्षीय लहान मुलाला फुस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला असून त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान त्या मुलाचे अपहरण झाल्या नसल्याची माहिती समोर येत आहे, तो स्वतः पुण्याला जाऊन परत घरी आल्याचे समजते.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ताजुद्दीन मुलाणी ( रा.घरनिकी ) यांचा १४ वर्षीय मुलगा दि . २८ रोजी दुपारी १२.३० वा. त्याच्या आईस दुकानातून खाऊ घेवून येतो असे म्हणून घरातून निघून गेला.
तो पुन्हा न परतल्याने त्याचा सर्वत्र शोध घेवून दुकानात जावून पाहिले असता तो मिळून आला नाही , नातेवाईक , मित्र तसेच मारापूर मल्लेवाडी , सिध्देवाडी , शरदनगर ,
देगांव, मंगळवेढा शहर येथे शोध घेवूनही तो न सापडल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्याने त्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार नोंदविली होती.
पोलिसांनी केले होते आव्हान
त्याचे वर्णन-उंची ५ फुट, अंगाने सडपातळ, रंगाने गोरा, अंगात गुलाबी शर्ट, निळी जीन पँट अशा वर्णनाचा मुलगा कोणाच्या निदर्शनास आल्यास
मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक शिवाजी विभुते हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज