टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूरमध्ये स्थायिक असलेले मात्र पुण्यातील मोठ्या कार्पोरेट कंपनीत नोकरीला असलेल्या पती-पत्नीचा कौटुंबिक न्यायालयात न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी घटस्फोट याचिका अर्ज मंजूर केला.
दोघांचा स्वभाव एकमेकांना पटत नसल्यामुळे ते गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत होते.
दाखल पत्नी वंदना ( वय २६ , रा . होटरी रोड ) व पती महेश ( वय ३० रा . जुळे सोलापूर ) हे दोघांचे एमबीए शिक्षण झाले आहे.
वंदना व महेश दोघेही पुण्यातील एकाच कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करीत होते. ओळखीने दोघांचा विवाह नोव्हेंबर २०२० मध्ये सोलापूर येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला.
लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच पती-पत्नीचा स्वभाव जुळत नव्हता. क्षुल्लक व किरकोळ कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती.
दोघांनी पूर्ण विचारांती सहसंमतीने घटस्फोट घेण्यासाठी अॅड . श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील हिंदू विवाह कायदा १ ९ ५५ कलम १३ बी प्रमाणे सहसंमतीने घटस्फोट याचिका मार्च २०२२ मध्ये दाखल केली होती.
दोघांमध्ये कोणतेही आर्थिक देवाण – घेवाण नाही. दोघे उच्च द्विपदवीधर आहेत. दोघांना एक लाख ते दीड लाख पगाराची नोकरी आहे.
पत्नीला दुसरे स्थळ आले आहे. त्यामुळे सहा महिने थांबणे शक्य नाही असा युक्तिवाद अॅड . श्रीनिवास कटकूर यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी घटस्फोट मंजूर केला.
याप्रकरणी पत्नी वंदना व पती महेश या दाम्पत्यातर्फे अॅड . श्रीनिवास कटकुर , अॅड . किरण कटकुर आणि अॅड . आनंद सागर यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज