mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उजनीचे पाणी तापले! राष्ट्रवादी सोलापुरचा पालकमंत्री बदलणार, यांच्या नियुक्तीच्या हालचाली; शरद पवारांचे जिल्ह्यातील नेत्यांना स्पष्ट संकेत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 21, 2022
in राजकारण, राज्य, सोलापूर
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पुढील एक-दोन महिन्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर उजनीच्या पाण्याचा वाद चिघळत आहे .

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवून ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करण्याबाबत विचार सुरू असल्याचे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शुक्रवारी याबद्दल स्पष्ट संकेत दिल्याचे जिल्ह्यातील नेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले असल्याने वृत्त आजच्या लोकमत मध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार राजन पाटील, महेश कोठे, दिलीप कोल्हे, विद्या लोलगे, हरिभाऊ जाधव यांनी सकाळी शरद पवार यांची बारामतीमध्ये भेट घेतली.

उजनी धरणावरील नव्या लाकडी निंबोळी प्रकल्पाच्या मुद्यामुळे जिल्ह्यातील वातावरण तापत आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरच अनेकांचा रोख आहे.

पालकमंत्री पक्ष संघटनेला वेळ देत नाहीत. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हटवा अशी मागणी या नेत्यांनी केल्याचे सांगण्यात आले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या अहमदनगरचे पालकमंत्री आहेत.  मुश्रीफांनाही बदल हवा आहे. दि.२५ मे नंतर बदल दिसेल असे शरद पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना सांगितले.

सोलापुरात कामगार वर्ग आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांना मुश्रीफ ओळखून आहेत. एकूणच ही पार्श्वभूमी पाहता मुश्रीफांना सोलापूरचे पालकमंत्री करण्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने लोकमतला सांगितले.(स्रोत:लोकमत)

यापूर्वीही झाला प्रयत्न

माजी आमदार राजन पाटील, बळीराम साठे, महेश कोठे यांनी यापूर्वीही दत्तामामा भरणे यांना हटविण्यासाठी फिल्डिंग लावली होती. यावर शहरातील राष्ट्रवादीचे काही नेते आणि धनगर समाजातील संघटनांनी आक्षेप घेतला. त्यामुळे हा विषय बाजूला पडला होता.

पाण्याबद्दल मंत्री जयंत पाटील देणार स्पष्टीकरण

उजनी धरणावरील नव्या प्रकल्पाचा वाद वाढत आहे. महाविकास आघाडीतील पक्षही राष्ट्रवादीवर टीका करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून खुलासा आवश्यक असल्याची चर्चाही या बैठकीत झाली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील लवकरच सोलापूर दौऱ्यावर येतील. पाटीलच याबद्दल खुलासा करतील असे ठरले. नव्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी होणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पालकमंत्री दत्तात्रय भरणे

संबंधित बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 8, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
Next Post
Breaking! निगोंडा पाटील यांचे निधन; सिध्दापुरात आज दुपारी अंत्यसंस्कार होणार

Breaking! निगोंडा पाटील यांचे निधन; सिध्दापुरात आज दुपारी अंत्यसंस्कार होणार

ताज्या बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 8, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा