टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील एका विवाहितेने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे.
या घटनेत विवाहित महिला व सहा महिन्याच्या परीचा मृत्यू झाला आहे .
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार , प्रियांका सूरज चवरे (३२, रा.पेनूर,ता. मोहोळ) या विवाहितेचे घरगुती कारणावरून पतीशी वाद झाला होता.
घरात कोणी नसल्याचे पाहून त्या महिलेने आपल्या सहा महिन्याच्या (परी) मुलीस व पाच वर्षाच्या (शंभू) मुलास विषारी औषध पाजले व स्वतःही ते विषारी औषध प्राशन केले.
काही वेळाने त्यांचे इतर नातेवाईक घरी आले असता घडला प्रकार त्यांना दिसून आला. तत्काळ त्यांनी त्या तिघांनाही पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्या लहान मुलीचा व महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पाच वर्षाच्या बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पंढरपूर पोलिसांकडे नोंद झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज