टीम मंगळवेढा टाईम्स ।
दिव्यांगांसाठीचा निधी मार्चअखेर खर्च करण्याच्या सूचना देऊन देखील हा निधी खर्च न केल्यामुळे संतप्त झालेल्या प्रहार अपंग संघटनेच्या वतीने येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर ४९ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
३१ मार्चपूर्वी दिव्यांगांचा निधी खर्च करण्यात यावा, अन्यथा गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढण्याचा इशारा प्रहार अपंग संघटनेच्या वतीने देण्यात आला.
परंतु, पंचायत समिती प्रशासनाने या प्रकाराकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे काल दिव्यांगांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
दिव्यांगांसाठी तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींनी दरवर्षी येणाऱ्या निधीतून खर्च करणे अपेक्षित होते. परंतु अद्याप जवळपास ४९ ग्रामपंचायतींनी निधी खर्च केला नाही.
निधी खर्चावरून संबंधित ग्रामपंचायतीवर कोणती कारवाई केली, असा सवाल उपस्थित करण्यात आल्यानंतर गटविकास अधिकारी निरुत्तर झाले होते.
याबाबतची माहिती संबंधित ग्रामसेवकांना विचारून घ्या, असे सांगितल्यानंतर दिव्यांगांच्या भावना आणखी तीव्र झाल्या. संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय आम्ही कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही , अशी कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली.
यावेळी प्रहार जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे , जिल्हा सरचिटणीस वंदना माने , महिला तालुकाध्यक्ष रुक्मिणी कोकरे , शहराध्यक्षा सविता सुरवसे , तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे,
पिंटू कोळेकर , भानुदास पडोळकर , राघू बुरुंगले , जयश्री कोळी , सुवर्णा पाटील, सुरेश धुमाळ संजय वाघमोडे , दत्तात्रय सांगोलकर दत्तात्रय कारंडे , तन्मय कांबळे , दरेप्पा कांबळे , तानाजी पवार , लखन बनसोडे आदी उपस्थित होते.
पंचायत समिती कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार मंगळवेढा तालुक्यातील १६ लाख ६१ हजार ७० ९ इतका निधी खर्च करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तालुक्यात आठ लाख २८ हजार ३५० रुपये इतका निधी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.
निधी खर्चाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल अकोला, आंधळगाव, लमाण तांडा , भाळवणी , बठाण , भोसे , चिक्कलगी , गोणेवाडी , डिकसळ , गुंजेगाव , हाजापूर , हुलजंती , कचरेवाडी , जालीहाळ , कागष्ट , खडकी , खवे , खोमनाळ , खुपसंगी,
लक्ष्मीदहिवडी , लोणार , माळेवाडी , महमदाबाद हु, ममदाबाद शे . मानेवाडी, मारापूर , मारोळी, मुढवी , नंदेश्वर , नंदुर , निंबोणी , पडोळकरवाडी पौट , रड्डे , सलगर बु , रेवेवाडी , शिरनांदगी , शिरसी , सोड्डी, तामदर्डी , उचेठाण , तांडोर , येड्राव , चोखामेळा नगर , गणेशवाडी , शेलेवाडी गुंजेगाव या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज