राजेंद्र फुगारे : पंढरपूर
पंढरपूर येथील के.बी.पी कॉलेज रोड, DVP स्क्वेअर, चंद्रभागा मैदान येथे आजपासून दि.९ मे पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डीव्हीपी उद्योग समुहाचे प्रमुख अभिजीत (आबा) पाटील यांनी दिली आहे.
गेली दोन वर्ष कोरोना काळ सुरू असताना जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्यावर्षी कोरोनाचा हाहाःकार सुरू असल्यामुळे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य रद्द करण्यात आले होते.
यंदा सर्वकाही सुरळीत झाल्यावर आपल्या पंढरपूरात छञपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे निमित्त संभाजी महाराजांचे आदर्श जीवन आणि स्वराज्याचा धगधगता इतिहास उभे करणारे
ऐतिहासिक महानाट्य ‘शिवपुत्र संभाजी महाराज’ अभिजीत आबा पाटील मित्र परिवाराकडून आयोजित करण्यात आले आहे.
या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराज यांची प्रमुख भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते खा.अमोल कोल्हे साकारणार आहेत.
निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र महाडिक आपल्या महाराजा शंभू छत्रपती, पुणे यांच्या प्रोडक्शन तर्फे सदर महानाट्य आपल्या समोर घेऊन येणार आहेत.
आज दि ५ मे ते ९ मे २०२२ या काळात के.बी.पी कॉलेज रोड, DVP स्क्वेअर, चंद्रभागा मैदान पंढरपूर येथे दररोज संध्याकाळी ६ वाजता हे महानाट्य संपन्न होणार आहे.
तरी विनामूल्य प्रवेश आहे. पंढरपूर येथे ठिकठिकाणी विनामूल्य पासची सोय करण्यात आली आहे.
शिवाजी महाराजांनी उभे केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला संघर्ष, त्यांचा पराक्रम शौर्य, बुद्धीमत्ता, रणकौशल्य, मुत्सद्देगिरी याची देही याची डोळा अमोल कोल्हेंच्या दमदार अभिनयाने अनुभवता येणार आहे.
या सोनेरी इतिहासाचा झंझावात अनुभवण्यासाठी रसिक प्रेक्षक, पंढरपूरातील मायबाप तमाम जनता, मित्र परिवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन अभिजीत आबा पाटील व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज