mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जुना अहवाल उकरून काढत थेट आमदार समाधान आवताडे यांच्यावर केली फौजदारी दाखल करण्याची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 30, 2022
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
जुना अहवाल उकरून काढत थेट आमदार समाधान आवताडे यांच्यावर केली फौजदारी दाखल करण्याची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रारूप यादीच्या प्रसिद्धीकरणानंतर

विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळाने 90 हजार 670 क्विंटल साखर पोत्याची परस्पर साखर विक्री करून सुमारे 29 कोटी रुपयांचा गैर व्यवहार केल्याप्रकरणी विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 जी वी निकाळजे यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये

साखर गोडाउन मध्ये तफावत आढळून आल्याने कारखान्याचे अध्यक्ष आ.समाधान आवताडे व संचालक मंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करून ऊस नियंत्रण आदेश 1966 मधील तरतुदीनुसार केलेल्या

अपहाराची रक्कम वसूल करून कारवाई करण्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप यांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध होण्यापूर्वीच आरोप-प्रत्यारोपांचे फटाके उडू लागले. याबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

श्री.संत दामाजी साखर कारखाना हा एकमेव सहकारी साखर कारखाना असून सदरच्या कारखान्यांमध्ये विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने गेल्या सहा वर्षांमध्ये मनमानी कारभार करून आणि गैरव्यवहार केले आहेत.

त्यामुळे सभासद व कामगार वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कारखान्याच्या काही सभासदांनी साखर संचालक कडे केलेल्या तक्रारीनुसार विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 चे जी.व्ही निकाळजे यांनी कारखाना स्थळावर भेट देऊन कारखान्याची सर्व गोडाऊन तपासणी करीत

दिनांक 6 मे 2019 रोजी प्रादेशिक सहसंचालक आकडे कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्यावर गंभीर दोष देत तो चौकशी अहवाल सादर केला त्यामध्ये साखर साठ्याच्या तपासणीमध्ये 90 हजार 670 क्विंटल ची तफावत आढळून आली असून एमएससी बँकेची परवानगी न घेता साखरेची परस्पर विक्री करून 29 कोटी कोटीची रक्कम भरलेली आहे.

अथवा इतर कोणत्या कारणासाठी वापरले याचा तपशील कारखान्याकडून दिला नाही तसेच कारखान्याचे शासकीय ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक संशयास्पद आहेत.

तसेच ऊस उत्पादकांची एफआरपी तत्कालीन नियमानुसार दिली नाही कर्मचाऱ्यांचा पगार प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम एम एस सी बँकेची रक्कम भरलेली नाही.

तसेच काही कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व फायनल रक्कम दिली नाही 2018 ते 21 या कालावधीत साखर संचालकाची पूर्व परवानगी व मंजुरी न घेता मनमानी पद्धतीने भंगारविक्री करून त्या रकमेचा हिशोब ठेवला नसल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे.

त्यामुळे कारखान्यावर मनमानी पद्धतीने कारभार पैशाची उधळपट्टी करून 200 कोटीचे कर्ज केले आहे.

विशेष लेखापरीक्षक यांनी साखर साठा व इतर बाबींचा चौकशी अहवाल देऊनही त्यावर अद्याप कारवाई झाली नाही कोरोनामुळे संचालक मंडळाला मुदत मिळाली आहे.

चेअरमन व संचालक मंडळ यांनी बेकायदेशीरपणे कामकाज करून सभासद,कर्मचारी यांची फसवणूक केली आहे.

तसेच लेखा परीक्षक यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार साखर गोडाऊन मध्ये तफावत आढळून आल्याने सहकार कायदा ऊस नियंत्रण 1966मधील तरतुदीनुसार चेअरमन आ समाधान आवताडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करून

सभासदांना न्याय देण्याची मागणी जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,सहकार मंत्री सचिव सहकार विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नुकतीच प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली या यादीमध्ये सभासद वगळल्या वरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच हा जुन्या लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी उकरून जगताप यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रंगत आणली.(स्रोत:सकाळ)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगतापआमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 20, 2026
सांगोल्यात जुगार खेळणाऱ्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त; १२ जणांना खेचत आणले पोलीस ठाण्यात; PSI नागेश बनकर यांची धडक कारवाई

April 19, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 20, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026
Next Post

मंगळवेढा नगरपालिकेच्या प्रशासकामुळे विकास कामाचा खोळंबा, 'प्रशासकाची' उचलबांगडी करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 21, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा