टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील श्री संत दामाजी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावला असताना तसेच शेअर्सची रक्कम पूर्ण केलेली असतानाही कारखाना प्रशासनाने यादीतून नाव वगळल्याची मतदार तक्रार
सभासद शेतकरी प्रज्वल लक्ष्मण दुर्गामाता नागणे (दुर्गामाता नगर , मंगळवेढा) यांनी मंगळवेढयाचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांचेकडे केली आहे.
नागणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागील पंचवार्षिक निवडणूकीत मी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच दि.२४ एप्रिल २०२२ रोजी पावती नं. ११५० व्दारे अपूर्ण शेअर्स रक्कम ५ हजार रूपये भरून रक्कम पूर्ण केली असून
सभासद रक्कम एकूण १० हजार १०० इतकी आत्तापर्यंत भरली आहे. सभासद साखर विक्री कार्ड व कोड नं.२८९९ असून ते कार्डही दिले गेले आहे.
या तक्रारीची संपूर्ण चौकशी करून मला माझा पवित्र मतदानाचा हक्क मिळवून दयावा अशी दिलेल्या अर्जामध्ये नागणे यांनी विनंती केली असून याच्या प्रती प्रादेशिक साखर सहसंचालक यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज