टीम मंगळवेढा टाईम्स ।
केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी हे रविवारी (दि. 24) सोलापूर दौर्यावर येत आहेत. त्यांच्याहस्ते सोमवारी (दि.25) विजयपूर-सोलापूर रस्त्याचे लोकार्पण होणार आहे.
यानिमित्ताने सोलापूर-विजापूर रस्ता आता खर्या अर्थाने वाहतुकीसाठी खुला होणार असून, सुसज्ज रस्त्यामुळे वेळ वाचणार आहे.
गडकरी यांचे 24 एप्रिल रोजी रात्री सातच्या सुमारास नांदेडहून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरून ते थेट हॉटेल बालाजी सरोवर येथे मुक्कामी राहणार आहेत.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजता विजापूर रोडवरील नेहरूनगर इथल्या शासकीय मैदानावर त्यांच्याहस्ते या रस्त्याचे लोकार्पण होणार आहे.
हा कार्यक्रम संपवून दुपारी बारा वाजता ते हेलिकॉप्टरने अक्कलकोटकडे जातील. त्याठिकाणी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन
सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. तेथून पुढे गाणगापूर येथे मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.त्यानंतर गाणगापूरहून ते गुलबर्गाकडे प्रयाण करतील. गुलबर्गाहून विमानाने ते दिल्लीला जाणार आहेत.
गडकरी यांच्या दौर्याच्या निमित्ताने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रस्ता उद्घाटनाची तर भाजपची स्वागताची तयारी सुरू झाली आहे.
दौर्यात गडकरी आता कोणकोणत्या कामांची घोषणा करणार तसेच नवे कोणते प्रकल्प जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सचिन कल्याणशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. तेथून पुढे गाणगापूर येथे मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर गाणगापूरहून ते गुलबर्गाकडे प्रयाण करतील.
गुलबर्गाहून विमानाने ते दिल्लीला जाणार आहेत. गडकरी यांच्या दौर्याच्या निमित्ताने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रस्ता उद्घाटनाची तर भाजपची स्वागताची तयारी सुरू झाली आहे.
दौर्यात गडकरी आता कोणकोणत्या कामांची घोषणा करणार तसेच नवे कोणते प्रकल्प जाहीर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (स्त्रोत:पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज