टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील एका वृध्द महिलेस अज्ञात व्हॅनमधून आलेल्या अज्ञात इसमाने गावी सोडण्याचा बहाणा करून चाकूचा धाक दाखवून अंगावरील सुमारे ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल काढून तो पळून गेल्याची फिर्याद सदर वृध्द महिलेने मंगळवेढा पोलिसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लवटे वस्ती-नंदेश्वर ता.मंगळवेढा येथील लक्ष्मी मुरलीधर शेजाळ ही ७२ वर्षीय वृध्द महिला गावी नंदेश्वरकडे जाण्यासाठी सांगोला नाका येथे थांबली असता
दुपारी १२.०० वा. एक ओमनी सारखी दिसणारी व्हॅन दिसल्यामुळे त्यावर तीने गाडीला हात केला. व नंदेश्वरला जाणार का असे विचारल्यानंतर त्याने बसा मावशी, आता लगेच हालतोय एक दोन सीटे घेवूयात असे सांगितल्यानंतर ती महिला गाडीत बसली.
या गाडीमध्ये दुसरे कोणीही प्रवासी नव्हते. त्यामुळे त्या महिलेने तुम्ही निघता का लगेच मी उतरू असे म्हणताच त्याने गाडी सुरु केली व तो निघाला. गाडीच्या काचेतून ती नक्की कोणत्या दिशेने जाते हे त्या महिलेला दिसले हे नाही.
अंदाजे १२.४५ वा. ही गाडी त्याने सांगोला येथील माण नदीच्या पुढे एका निर्जन ठिकाणी थांबवली. तेथे चाकूचा धाक दाखवून अंगावरील सोने काढून दया, अन्यथा मारून टाकीन अशी धमकी दिल्याने ती वृध्द महिला घाबरली.
व घाबरून तीने एक तोळयाचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅमचे कानातील सोन्याचे वेल, २ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बुगडया, २ ग्रॅम सोन्याची फुले असा एकूण ५५ हजार ५०० रुपयांचा ऐवज त्याला काढून दिला.
त्यानंतर त्या महिलेने मंगळवेढा पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
भा.दं.वि.सं. कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल असून याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाहेब पिंगळे हे करीत आहेत.
दरम्यान, सदर गाडीचा ड्रायव्हर याने काळ्या रंगाचा शर्ट, पँट, डोक्याला काळी टोपी परिधान केली होती. तो रंगाने काळा व अंगाने मध्यम वर्गीय होता. त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे होते. असे त्या वृद्धेने सांगीतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज