टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्यामुळे सध्या 3 गावातून पाण्याच्या टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल झाले.
दरम्यान, बंद आंधळगाव व भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा सुरू करण्यासंदर्भात आ.समाधान आवताडे यांनी आज योजनेत समाविष्ट असणाऱ्या गावांची बैठक बोलावली.
मंगळवेढा तालुक्यामध्ये आंधळगाव व इतर दहा गावासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून आंधळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली.
या योजनेचे पाणी बहुतांश गावात घेतले जात नसल्यामुळे ही योजना सध्या बंद आहे त्याच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी येतो.
परंतु योजना मात्र कायमस्वरूपी चालवली जात चालली जात नाही या योजने अंतर्गत संत चोखामेळानगर व संत दामाजी नगर या दोन मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश केला तर ही योजना कायमस्वरूपी चालवणे शक्य होणार आहे.
तर भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची सोड्डी शिवनगी येळगी भागातील कामे व थकीत वीज बिल कोणी भरायचे हा प्रश्न अर्धवट असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 39 गावासाठी असलेल्या
भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केली शिखर समिती स्थापन करण्यावरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या.
जिल्हा परिषदेने एक-दोन महिने वगळता ही योजना 18 ऑगस्ट 2021 पासून विज बिल न भरल्यामुळे बंद आहे.
सध्या उन्हाळ्याची पाणी टंचाई लक्षात घेता केवळ वीज बिलावरून बंद असलेली योजना सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
रविवारी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बैठक
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा, महावितरणचे अधिकारी यांच्यासह या योजनेचे लाभ घेत असलेल्या गावच्या सरपंच व ग्रामसेवकांना आज रविवारी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात बैठकीसाठी बोलावण्यात आली.
या गावात टँकर मंजूर होण्याबाबत साशंकता
त्यानंतर या योजनेचे भवितव्य ठरणार आहे परंतु या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमुळे या गावात टँकर मंजूर होण्याबाबत साशंकता आहे.
जल जीवन मिशन मधून देखील कामे मंजूर होण्याबाबत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बैठकीतून पाणी योजना सुरू करण्यावर तोडगा निघणार कि अंधकारमय होणार हे निश्चित होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज