टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय हे शैक्षणिक वर्ष जून 2022 ते मार्च 2023 याकालावधीत मुलांना अभ्यास, खेळ, गाणी, बडबडगीते, संस्कारप्रिय गोष्टी अशाप्रकारे अनेक गोष्टी घेईल.
एप्रिल व मे या दोन महिन्यात मुलांना वर्षभर शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, खेळ, संगीत, उन्हाळी शिबिर, संस्कार वर्ग इत्यादी घेण्याचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार यांनी पालक सभेच्यावेळी घेतला.
पालक सभेत मुलांनी शाळेत येताना स्वत:ची तयारी स्वत: करण्यास शिकविणे, खाऊचा डब्यात काय द्यावेत व किती द्यावेत, दिवसातील ठरवून दिलेल्या वेळेतच उजळणी घेणे, मुलांनी केलेल्या अभ्यासाचे किंवा कामाच्या कौतुकाची शाब्बासकी देणे, मुलां-मुलींना मित्रांबरोबर शारीरिक खेळ खेळण्यास देणे, पुरेपुर झोप घेणे या साध्या साध्या गोष्टींची सवय लावावी. हीच सवय आयुष्यभराची शिदोरी बनत राहील. इत्यादी माहिती देण्यात आली.
मंगळवेढा येथील प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील पालक सभा आयोजित करण्यात आली होती. सदर पालक सभेस माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
पालकसभेच्या उपाध्यक्षा संगिता संदिप जाधव व सदस्या विजया अरुण गुंगे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करुन पालक सभेस सुरुवात करण्यात आली.
एप्रिल व मे या दोन महिन्यात मुलांना वर्षभर शिकविण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी
म्हणजेच जून 2022 पासून वर्षभर म्हणजेच बारा ही महिने चालू राहणार आहे. या निर्णयास प्रायमा मधील सर्वच शिक्षिकां व कर्मचारी वर्गानी 12 ही महिने शाळा चालविण्याचे स्वागत केले.
प्रायमामधील शिक्षिका व कर्मचारी हा नेहमीच नवनवीन प्रकल्प राबिण्यास आनंदी व उत्साही असतो.
प्रायमाच्या शिक्षिका व कर्मचारी 12 ही महिने चालविण्याच्या निर्णयास पाठींबा व प्रतिसाद दिल्यामुळे संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार आणि संचालिका ईशा पटवर्धन, जयश्री कुंभार यांनी व उपस्थित माता पालकांनी प्रायमामधील सर्वच शिक्षिका आणि कर्मचारी वर्गाचे मनभरुन कौतुक व अभिनंदन केले.
शिक्षिका व कर्मचारी नेहमीच प्रायमाचा व विद्यार्थी-विद्यार्थीचे नाव लौकीक व्हावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
शैक्षणिक वर्ष जून 2022 ते मार्च 2022 अखेर खेळ वर्ग – 2.5 वर्षे, शिशु वर्ग – 3 वर्षे, लहान वर्ग – 4 वर्षे, मोठा वर्ग – 5 वर्षे वयोगटातील मुलां-मुलींना नियमित शिक्षण वर्षभर घेतला जाणार आणि एप्रिल, मे या महिन्यात वर्षभर शिकविलेल्या सर्वच अभ्यासक्रमांची पुन्हा उजळणी घेतली जाणार आहे.
त्यामुळे मुलांना अभ्यासाची व शाळेची आवड आणि ओढ कायम राहण्यास सुरुवात होणार आहे.
मुलांना अभ्यासासोबतच बौध्दिक कौशल्य वाढणार
अभ्यासासोबतच बौध्दिक कौशल्य वाढविण्यासाठी इतर भौतिक साधानांचा देखील वापर करुन घेतला जाणार त्याशिवाय चित्रकला, संगीत, खेळ इतर मनोरंजनात्मक गोष्टी देखील घेतले जाणार आहे.
मुलांना त्यांच्या आवडीनुसार हसत-खेळत शिकविले जाणार असल्यामुळे मुलां-मुलींचे गैरहजेरीचे प्रमाण आपोआपच कमी होणार आहे.
यामुळे मुलां-मुलींचा शैक्षणिक पाया भक्कम होण्यास आणखी मदत होणार आहे.
शिक्षकांनी मनात आणले तर काय करु शकतात हे प्रायमाच्या शिक्षिकांनी आज दाखवून दिलेले आहे.
मुलांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे यासाठी 6 वर्ग खोल्या, संगणक लॅब, अतिथी गृहे, अशा 10 खोल्या तर प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, टी.व्ही., सीसीटीव्ही तसेच स्वच्छता गृह आणि पाण्याची सोय उपलब्ध आहेत.
संपूर्ण परिसरात मुलां-मुलींना आवडतील अशा बोलक्या भिंती (विविध चित्रे) चे खास आकर्षण आणि फुलांची झाडे, खेळण्यासाठी मोठे मैदान, सावलीकरिता मोठी दोन झाडे इत्यादी सोयी उपलब्ध आहेत. अशी माहिती प्रायमाचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार यांनी दिलेली आहे.
पालक सभेच्या वेळी माता पालक तहसिन मुलाणी, सरोजा वेदपाठक यांनी ही वर्गात शिकविण्याच्या पध्दती, मुलांकडून नेमका अभ्यास कसा घेतला जातो, कसा घ्यावा, कोणत्या गटातील मुलांकडून काय अपेक्षा पालकांनी ठेवाव्यात याबाबत विस्तृत माहिती दिली.
पालक सभा यशस्वी करण्यासाठी प्रायमा संस्थेच्या सचिवा वैशाली कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका निता डोके, लता कुलकर्णी, सविता रत्नपारखी, गीता गुंगे, स्वाती माळी, सुनिता कुंभार, पूजा ढोणे, वैशाली खांडेकर, अश्विनी टाकणे, मदतनीस सुजाता मुदगूल, शिला पलंगे, सुजाता चिंचकर यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज