टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत झाली . या बैठकीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
जिल्हाध्यक्षपदी पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची निवड करण्यात आली. सचिवपदी नायब तहसीलदार प्रवीण घम तर सल्लागारपदी मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांची निवड झाली आहे.
बैठकीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदाधिकारी व सदस्य यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
सहाध्यक्षपदी तहसीलदार अमोल कुंभार, उपाध्यक्षपदी नायब तहसीलदार रविकिरण कदम, सदस्य सचिवपदी नायब तहसीलदार प्रवीण घम, तर सल्लागारपदी तहसीलदार स्वप्निल रावडे , तहसीलदार प्रशांत बेडसे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार बेल्हेकर यांनी संघटनेच्या ध्येयधोरणानुसार सोलापूर जिल्ह्यात पुढील वाटचाल करू, अशी ग्वाही दिली.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज