टीम मंगळवेढा टाईम्स।
सध्या कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे आटोक्यात आली असून सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे अवघे दहा सक्रिय रुग्ण आहेत.
मंगळवेढा, बार्शी, करमाळा, माळशिरस, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाच्या दोन्ही लाटेत प्रशासनाची चिंता वाढविलेला कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे.
कडक लॉकडाउन आणि पुन्हा कडक निर्बंध लागू केल्यानंतर कोविशिल्ड व कोवॅक्सिन या प्रतिबंधित लसीकरणामुळे कोरोनाला वेळीच रोखण्यात यश मिळाले.
राज्यातील जवळपास आठ कोटी व्यक्तींनी प्रतिबंधित लस टोचली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील 30 लाख व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये माळशिरस, बार्शी, पंढरपूर या तीन तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यानंतर सर्वच तालुक्यासह सोलापूर शहराचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक राहिला.
प्रतिबंधित क्षेत्र आणि दंडात्मक कारवाईमुळे लोकांनी नियमांचे पालन करायला सुरवात केली. शिक्षकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात आला. त्याचाही मोठा लाभ कोरोनाला रोखण्यासाठी झाला.
आता हा कोरोना परतीच्या वाटेवर असून अक्कलकोट, माढा, पंढरपूर या तालुक्यात प्रत्येकी एक तर सांगोल्यात दोन आणि मोहोळ तालुक्यात सर्वाधिक तीन सक्रिय रुग्ण आहेत.
तरीही नियम पाळा
चौथी लाट नाहीच, तरीही नियम पाळा
जगातील काही देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. आपल्याकडे कोरोनाची चौथी लाट येईल, अशी भीती आहे.
पालन करावेच लागेल
पण, तुर्तास तशी कोणतीही शक्यता नाही. तरीही, नागरिकांनी आणखी काही दिवस मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावेच लागेल.
दुसरीकडे 12 वर्षांवरील सर्वांनीच कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.(स्रोत; सकाळ)
ग्रामीणमधील कोरोनाची स्थिती
एकूण बाधित –
1 लाख 86 हजार 036, कोरोनामुळे मृत्यू – 3 हजार 726, कोरोनामुक्त रुग्ण – 1 लाख 82 हजार 302, सक्रिय रुग्ण – 8
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज