टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.संत दामाजी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ सालच्या २९ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ उद्या शुक्रवार दि.२५ मार्च रोजी दु.४ वाजता
कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे यांचे शुभहस्ते व व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.
तत्पूर्वी दु.३ वाजता कारखान्याचे संचालक रामकृष्ण चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुभद्रा चव्हाण या उभयतांचे शुभहस्ते
श्री.सत्यनारायण महापुजेचे आयोजन केले असल्याची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक रमेश गणेशकर यांनी दिली.
आजअखेर एवढे गाळप व साखर पोत्याचे उत्पादन
चालू गळीत हंगामामध्ये आजअखेर कारखान्याने १२६ दिवसांमध्ये एकूण ३ लाख ८४ हजार २०० लाख मे.टन गाळप करुन ३ लाख ९५ हजार ९०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे.
तसेच सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के असा मिळाला असुन आपला साखर कारखानासोलापूर जिल्ह्यामध्ये साखर उतार्यामध्ये दुस-या क्रमांकावर राहिला आहे.
कार्यक्षेत्रातील सभासद,बिगरसभासदांचा संपुर्ण ऊस गाळप करुनच सांगता समारंभाचे आयोजन केले आहे.या हंगामाकरिता सोलापुर जिल्हयात मोठया प्रमाणात ऊसाच्या लागणी झालेल्या होत्या.
तसेच ऊसाचे एकरी टनेज वाढलेले असताना ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा कमी असल्यामुळे सर्वच कारखानदारांना ऊसगाळप करणे अडचणीचे झाले आहे.
दामाजी कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे व संचालक मंडळाच्या कुशल नियोजनामुळे यावर्षी चांगले गळीत झाले आहे.
तसेच या गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेकदार, सिझन कंत्राटी ठेकेदार, माल पुरवठा करणारे व्यापारी, साखर खरेदी करणारे व्यापारी, पत्रकार, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले सहकार्य केल्यामुळे ऊस गळीत हंगाम यशस्वी करुन शकलो असे प्र.कार्यकारी संचालक यांनी सांगितले.
सदरच्या गळीत हंगाम सांगता समारंभासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन शेवटी त्यांनी केले.
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज