टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा पोलीसांनी घरफोडीचे तयारीने आलेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांचेकडुन 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन 5 लाख 58 हजार 300 रूपयांचे 10 तोळे सोने केले जप्त केले असून दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे, देशमुख व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाल्या, सन 2021-22 मध्ये मंगळवेढा मध्ये सातत्याने घर फोड्या होत होत्या त्यात ठाण्याच्या हदीत झालेल्या 8 घरफोडी गुन्हे उघडकीस आणने पोलीसांपुढे आव्हान असतानाच दि. 2 मार्च रोजी पोना दयानंद हेंबाडे व पोना सुनिल मोरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
मंगळवेढा हदीत घरफोडी गुन्हे करणारे दोन सराईत आरोपी संतोष मच्छिंद्र चव्हाण , मोहन उर्फ महेश उर्फ रोहन मच्छिंद्र चव्हाण दोघे राहणार मदार वस्ती, जत ता. जत जि. सांगली असे घरफोडी करण्यासाठी तयारी निशी मौजे शिरसी मार्गे मंगळवेढा येथे येणार आहेत अशी माहिती मिळताच
पोना दयानंद हँबाडे यांनी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना कळविले असता पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी स्वतः सोबत पोना दयांनद हैबाडे, पोना सुनिल मोरे,पोकॉ सुरज देशमुख,पोहेकॉ वाघमारे व सपोनि बापुसाहेब पिंगळे यांचे
सोबत पोहेकॉ/सुनिल गायकवाड, पोना प्रमोद मोरे, पोना बापु पवार, पोकॉ राजु आवटे अशी दोन पथके तयार करून शिरसी येथे सदर आरोपींना पकडण्या साठी सापळा लावला असता रात्रौ 9 वाचे सुमारास वाणीचिंचाळे मार्गे शिरसीचे दिशेने
दोन संशयीत इसम मोटर सायकलवर येत असताना दिसले त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून पकडुन त्यांची अंगझडती व त्यांचे जवळीच बॅग तपासले असता त्यांचेकडे चाकु, ऑडजेस्ट पान्हा, स्कु ड्रायव्हर, बॅटरी, लोखंडी कटावणी व इतर घरफोडीचे साहीत्य मिळुन आले.
त्यांना पोलीस ठाणेस आणुन त्यांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी मंगळवेढा ग्रामीण भागात 8 घरफोडया करून 10 तोळे सोन्याचे दागीने चोरल्याची कबुली दिली.
सदर आरोपींना २ मार्च २०२२ रोजी अटक करून प्रथमवर्ग न्यायाधीश मंगळवेढा यांचे न्यायालयात हजर करून त्यांची 2 दिवसाची पोलीस कोठडी घेवुन त्यांचेकडुन 5 लाख 58 हजार 300 रूपये किंमतीचे 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने त्यात एक मोटर सायकल असे निवेदन पंचनाम्या प्रमाणे काढुन दिले.
यात आरोपींचा एक साथीदार निष्पन्न झाला असुन त्यांस लवकरच अटक करून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज