टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील प्रियांका विठ्ठल शिखरे (वय 25) हिचे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याची मंगळवेढा पोलिसात आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
दरम्यान या मयताच्या नातेवाईकांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस प्रशासनाचेवतीने करण्यात आले आहे.
यातील मयत प्रियांका विठ्ठल शिखरे ही मूळची राहुलनगर निगडी पुणे येथील असून ती सध्या मंगळवेढयात रहावयास आहे.
दि.7 डिसेंबर रोजी ती गंभीर आजारी असल्याने तीला सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तीचा भाऊ संजय शिखरे याने दाखल केले होते.
तीच्यावर उपचार चालू असताना दि.16 डिसेंबर रोजी रात्री 11.00 वा. ती मयत झाली असून तीच्या नातेवाईकांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन तपासिक अंमलदार सलीम शेख यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज