टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी कारखान्याकडे ऊस भरून जाणार्या ट्रॅक्टरला क्लूजर जीपने राँंग साईडने येवून जोराची धडक दिल्याने ट्रॅक्टर चालकाच्या अंगावर ऊस पडून ट्रॅक्टर चालक दत्तात्रय सुखदेव दोलतोडे(वय 45 रा.मरवडे) याच्या मृत्यूस
व अपघातामध्ये जवळपास 3 लाखाचे नुकसानास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जीपचालक संतोष आण्णाप्पा माने (वय 33,रा.उमदी ता. जत) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील मयत ट्रॅक्टर चालक दत्तात्रय दोलतोडे हा दि.5 रोजी रात्री 8.45 वा.ट्रॅक्टर नं.एम एच 13,डी.ई.6838 हा दोन चाकी ऊसाने भरलेल्या गाडयामध्ये ऊस घेवून हुलजंतीमार्गे
भैरवनाथ साखर कारखान्याकडे आपल्या साईटवरून जात असताना विश्वनाथ कनशेट्टी यांचे शेताजवळ उमदीकडून मरवडेकडे जाणारी क्लूजर जीप क्र.एम एच 13,ए.सी.0031 चा चालक संतोष माने याने
भरधाव वेगात राँग साईडने येवून ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकास जोराची धडक दिल्याने गिअर बॉक्स तुटून दोन भाग होवून ट्रॅक्टरला जोडलेली छोटा दोन चाकी गाडा पलटी होवून
त्याखाली ट्रॅक्टरचालक तथा मयत हे ऊसाखाली सापडून अंगावर ऊस पडून ते गंभीर जखमी होवून जागेवर मयत झाले.
या घटनेत जीपचालकही जखमी झाला.तसेच या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मिळून अंदाजे 3 लाखाचे नुकसान झाल्याचे मयताचा भाऊ मल्हारी दोलतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज