टीम मंगळवेढा टाईम्स।
भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे.
या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली
महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून उद्या सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केलं आहे.
The state government has declared a public holiday in the state on Monday, February 7, 2022, to mourn the demise of Bharat Ratna Lata Mangeshkar.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
शिवाजी पार्कात होणार अंत्यसंस्कार
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी येथे अंत्यसंस्कार होणार असून यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत.
मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच इतर मान्यवर मंडळी शिवाजी पार्कमध्ये उपस्थित राहणार आहेत. सर्वसामान्यांनाही लता दीदींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यासाठी तयारी शिवाजी पार्क मैदानात मुंबई महापालिकेकडून केली जात आहे.
देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे केंद्र सरकारकडून देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सरकारी कार्यालयं, मंत्रालय, संसद भवनावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज