टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा, संचलित दलितमित्र कदम गुरुजी शास्त्र व कला महाविद्यालय जून 2022 पासून सुरू करणेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांनी मान्यता दिलेली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांनी मान्यतेचे पत्र शिक्षण प्रसारक मंडळास दिलेले आहे.
त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा येथील शिक्षणसंकुलात नव्याने दलितमित्र कदम गुरुजी शास्त्र व कला महाविद्यालय मध्ये शास्त्र भाग 1,2,3 व कला भाग 1,2,3 चे वर्ग जून 2022 पासून सुरू होत आहेत.
सन 2008 मध्ये सोलापूर विद्यापीठाने महाविद्यालयाची मान्यता काढून घेतली होती.त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळाने मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, सदर याचिकेचा दि. ७/१०/२०२१ रोजी निकाल होऊन मान्यता काढून घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता.
शिक्षण प्रसारक मंडळाने विद्यापीठाकडे संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्ज दाखल केला होता.सोलापूर विद्यापीठाने दिनांक १५.१.२०२२ रोजी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे.व तसे पत्रही दिले आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापुरच्या चार सदस्यीय कमिटीने दलितमित्र कदम गुरुजी शास्त्र व कला महाविद्यालयास भेट देऊन येथील भव्य इमारत व उपलब्ध भौतिक सोयीसुविधांबाबत समाधान व्यक्त केले होते.
मंगळवेढा येथे सुरू असणारे अनुदानित महाविद्यालय अंतर्गत वादामुळे बंद पडल्याने तालुक्यातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून महाविद्यालय सुरु व्हावे यासाठी सातत्याने मागणी होत होती, विद्यार्थी व पालक वर्गाची मागणी मान्य झाल्या ने विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व दलित मित्र कदम गुरुजी शास्त्र व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कदम, संस्थेच्या माजी अध्यक्षा डॉ.सौ.मिनाक्षी कदम, अध्यक्ष ॲड.सुजित कदम, उपप्राचार्य सौ. तेजस्विनी महाडिक-कदम, संस्थेचे सचिवा सौ.प्रियदर्शनी कदम-महाडिक संचालक श्रीधर भोसले, रामचंद्र नेहरवे व संस्थेच्या
सर्व संचालकांच्या सातत्याच्या प्रयत्नास यश मिळाले व दलित मित्र कदम गुरुजी यांचे स्वप्न पूर्णत्वास आलेले आहे.
त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड.सुजित कदम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.संस्थेच्या वतीने हायकोर्टामध्ये जेष्ठ ॲड.अनिल अंतुरकर,ॲड.प्रशांत भावके यांनी काम पाहिले त्यामध्ये ॲड.प्रकाश घुले,ॲड.सचिन गोसडे,सतीश सावंत सर यांनी मदत केली.त्यामुळे संस्थेचे सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज