टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहरात ओमिक्रॉनचा पहिला रूग्ण सापडलेला आहे. दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी हा रूग्ण पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तो अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता.
त्याचा अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. ३० डिसेंबर २०२१ रोजी त्याचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी दिली.
संबंधित रूग्ण हा २७ डिसेंबर २०२१ रोजी पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर अश्विनी रूग्णालयात तो उपचार घेत होता. त्याचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला मुंबईत पाठविण्यात आले होते.
दि.३० डिसेंबर २०११ रोजी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईला रवाना केले होते. त्यानंतर तेथून २ जानेवारी २०२२ रोजी त्याला घरी पाठविण्यात आले.
या व्यक्तीच्या संपर्कातील एक व्यक्तीदेखील पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचेही आरोग्य अधिकारी बसवराज लोहरे यांनी सांगितले.
सदर व्यक्तीचा आयसोलेशनचा कालावधी संपला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारचा फैलाव होणार नाही. सुरूवातीच्या पहिल्या तीन दिवसातच त्याचा फैलाव होऊ शकतो.
मात्र सदर व्यक्तीपासून कोणत्याही प्रकारचा फैलाव होण्याची शक्यता नसल्याचे आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी सांगितले. कोव्हिड नियमांचे तंतोतंत पालन केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही.
त्यामुळे सोलापूरकरांनी नियमांचे पालन करावे. तसेच ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी केले.
दहा दिवसात वाढले तब्बल २३५ रुग्ण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या गतीने वाढत असून मागील फक्त दहा दिवसात शहरात तब्बल २३५ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.
१ जानेवारीला शहरातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण फक्त १२ होते तर १० जानेवारीरोजी २४८ अॅक्टिव्ह रुग्ण असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
कोरोनाची पहिली आणि दुसरी असताना मागील अनेक महिन्यात शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती. परंतु देशात तिसऱ्या लाटेने शिरकाव शिरकाव केल्यापासून शहरातील कोरोना रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. अवघ्या दहा दिवसात २३५ रग्ण वाढ झाली आहे. ही सोलापूरकरांसाठी धोक्याची घंटाच आहे.
शहरात १० जानेवारीपर्यंत ८८ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय तर ५७.२ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १५ ते १८ वयोगटातील १८.३ टक्के युवकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
ज्या नागरिकांनी अद्याप लसच घेतली नाही, त्यांनी लस घेणे गरजेचे आहे. कारण तिसऱ्या लाटेत कोरोना झाल्यानंतर दवाखान्यात दाखल होणाऱ्यांपैकी बहुतांश लस न घेतलेले रुग्ण आहेत.(स्रोत:द लेमन न्यूज)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज