टीम मंगळवेढा टाइम्स ।
वसुंधरा अभियान जनजागृतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावात ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी ‘एक बैठक-वसुंधरेसाठी’ हा उपक्रम १५ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.
त्यानुसार, बैठका व चर्चात्राचे आयोजन सोलापूर जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
सध्या सोलापूर जिल्ह्सात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करणेत आले आहे.
‘माझी वसुंधरा’ अंतर्गत या उपक्रमांत स्वच्छतेवर तसेच पृथ्वी, जल, वायू, अग्नि, आकाश या उपक्रमावर विविध स्पर्धांचे आयोजन करणेत आले आहे.
या कार्यक्रमाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य हे देखील उपस्थित राहणार आहेत.
‘माझी वसुंधरा’ अंतर्गत २.० विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेते यांना एक रोप देऊन गौरव करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्र्यात १० हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या१४ ग्रामपंचायती आहेत. माझी वसुंधरा २.० ची चळवळ सुरू करण्यात आली आहे.
गावातील उजनी मंडळ व युवक मंडळ यांचाही सहभाग घेण्यात येत आहे. सध्या देशात आझादीचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व माहिती व उपक्रम केंद्र शासनाचे संकेतस्थळाने अपलोड करण्यात येत आहेत.
जिल्हा स्तरावरून सर्व विभाग प्रमुख पालक अधिकारी म्हणून तालुक्यांस नियुक्त करण्यात आले आहे. सर्व पालक अधिकारी ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहणार आहेत, असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले.
या निमित्ताने जिल्ह्यात स्वच्छतेची व पर्यावरणाची चळवळ सुरू झाली आहे. या निमित्ताने १५ डिसेंबर रोजी SSG2021 या ऍपवर व वेबवर स्वच्छतेवरील अभिप्राय घेणेचे नियोजन करण्यात येत आहे.
सर्व कर्मचाऱ्यांनी १४ व १५ डिसेंबर SSG2021 या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ या उपक्रमांत सहभागी होऊन ग्रामस्थांचा अभिप्राय घेण्याचे आवाहन दिलीप स्वामी यांनी केले आहे. लोकांचा प्रत्येक अभियात सहभाग घ्या असेही स्वामी यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज