mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चिंताजनक! सोलापुरच्या 100 गावांमध्ये लसीकरणचे प्रमाण कमी, मंगळवेढ्यातील ‘या’ गावांचा समावेश; पालक अधिकारी नियुक्‍त

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 14, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढेकरांनो! तिसरी लाट येण्याअगोदर कोरोना लस घ्या; शिर्के हॉस्पिटलमध्ये मिळतेय कोविशील्ड लस

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 144 गावांपैकी 100 गावांमध्ये लसीकरण कमी झाल्याने त्या गावांसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालक अधिकारी नियुक्‍त केले आहेत.

त्यात गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,

कृषी विकास अधिकारी, जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहायक व पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील 85 टक्‍के व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 72 टक्‍के व्यक्‍तींनीच लस घेतली असून आणखी 28 टक्‍के व्यक्‍तींनी एकही डोस घेतलेला नाही.

महाराष्ट्रातील सर्वात कमी लसीकरणात सोलापूरचा समावेश असल्याने अप्पर मुख्य सचिवांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर

जिल्हाधिकाऱ्यांनी पालक अधिकारी नियुक्‍त करून 100 टक्‍के लसीकरणाचे नियोजन केले आहे.

निर्बंध घालूनही अनेकजण लस घेत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. आशासेविका, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लस न टोचलेल्यांना व दुसरा डोस न घेतलेल्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.

तरीही, लस न घेणाऱ्यांवरील निर्बंध आगामी काळात आणखी वाढतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

लसीकरणात पिछाडीवर असलेली गावे

मंगळवेढा : मंगळवेढा शहर, तळसंगी, खोमनाळ, हुलजंती, हन्नुर, गोनेवाडी, दामाजीनगर, नंदेश्‍वर, श्रीनांदगी, नंदूर, मानेवाडी.

सांगोला : ह. मंगेवाडी, धायटी, मेथवडे, चिंचोळी, देवकतेवाडी, बामणी, बुंरगेवाडी, तरंगेवाडी, डिकसळ, बंडगरवाडी.

पंढरपूर : गोपाळपूर, ताप शेटफळ, तनाळी, देवडे, आंबेचिंचोळी, फुलचिंचोळी, वीटे, सांगवी, पंढरपूर शहर, करकंब.

करमाळा : निमगाव, ध्यायखिंडी, बिटरगाव वरकुटे, बिटरगाव केम, केम, देवीचामाळ, पांगरे, अवाटी, पांडे, पोफळज.

माळशिरस : शंकरनगर, तोंडले, खाळवे, महाळुंग, हनुमानवाडी, माळशिरस, अकलुज, नातेपुते, वेळापूर.

अक्‍कलकोट : नागणसूर, मिरजगी, बऱ्हाणपूर, हद्रा, पितापूर.

माढा : महादेववाडी, वडाचीवाडी, जाधववाडी, घोटी, मालेगाव, दहिवळी, वाडोळी, गारअकोले, माढा, रोपळे.

मोहोळ : शेजबाभुळगाव, वटवटे, शेटफळ, अर्जुनसोंड, टाकळी सिंकदर, सावळेश्‍वर, भांबेवाडी, वडवळ, पेनूर, विरवडे बु.

दक्षिण सोलापूर : रामपूर, वळसंग, गुंजेगाव, शिरवळ, फताटेवाडी, होटगी स्टेशन, वडजी, वरळेगाव, सिंदखेड, गुर्देहळ्ळी.

उत्तर सोलापूर : कवटे, वांगी, गावडी दारफळ, अकोलेकाटी, राळेरास

बार्शी : वैराग, आगळगाव, पानगाव, पांगरी, उपळेदुमाला, भांतबरे, घारी, घाणेगाव, श्रीपतपिंपरी, देगाव.

प्रत्येक गावातील 18 वर्षांवरील 100 टक्‍के व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचून घेण्यासाठी आता ठोस नियोजन करण्यात आले आहे.

लसीकरण कमी असलेल्या गावांमध्ये दिवसरात्र कॅम्प आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 16 डिसेंबर रोजी जिल्हाभर कॅम्प आयोजित करून 100 टक्‍के लसीकरण करुन घ्यावे.

काहीजण राहिल्यास 17 व 18 डिसेंबर रोजी त्यांचे लसीकरण करून घेतले जाणार आहे. तहसिलदार व तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी समन्वय करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.(स्रोत:सकाळ)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लसीकरणसोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

November 28, 2025
आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
Next Post
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सोलापूर जिल्ह्यात 'या' एकाच दिवशी सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणार बैठका

ताज्या बातम्या

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

सौ.प्रीती तेजस सूर्यवंशी यांची प्रचारात आघाडी; प्रभाग क्र.5 मध्ये सूर्यवंशी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद

November 28, 2025
आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..