टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालयात एकाच विभागात पाच किंवा तीन वर्ष कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लवकरच बदल्या करण्यात येणार आहेत.
यासंदर्भात माहितीचे संकलन केले जात असून सर्व माहिती एकत्रित करून एकाच वेळी या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिली.
एकाच विभागात तीन वर्षे व पाच वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी जि अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे केली होती.

मध्यंतरी दोन दिवसांच्या फरकाने सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन कारवाया केल्या. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी तीन वर्षे व पाच वर्षापेक्षा अधिक काळ एकाच विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या त्वरित बदल्या करण्यात याव्यात.
त्याबरोबरच ज्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया दुसऱ्या विभागात आहेत. मात्र, तिसऱ्याच विभागात ते प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तया रद्द करण्याचे आदेश स्वामी यांनी दिले होते.
याबाबत विभागप्रमुखांकडून माहिती संकलनाची कार्यवाही सध्या सुरू असून माहिती एकत्रित करून जि.प.अध्यक्ष कांबळे, सीईओ स्वामी यांच्या सूचनेनुसार तीन वर्ष पाच वर्षापेक्षा एकाच विभागात कार्यरत
असणाऱ्या व प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तया रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण प्रशासन विभागाच्या प्रमुख पाटील यांनी दिले आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











