टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातून दुष्काळ हटेना, आपण सारे भयानक अश्या रोगराईला तोंड देत आहोत, या भागाचा महत्वाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, सरकारला धारेवर धरणार आहे,
दुष्काळात जन्माला आलो, तरी दुष्काळात आपण आता, मरणार नाही, असा विश्वास पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी शिवणगी येथे बोलताना व्यक्त केला.
आ.आवताडे पुढे म्हणाले, दुष्काळात आपण अनेक संकटांना तोंड देतोय, पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे,यासाठी हा मुद्दा आता मी उचलून धरणार असून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला धारेवर धरून, लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे,
याशिवाय पंचायत समिती, जिल्हा परिषद,आमदार फंड आधीच्या माध्यमातून या भागाला विकास कामासाठी कुठे निधी कमी पडू देणार नाही,
मंगळवेढा तालुक्याचे आराध्यदैवत महालिंगराया बिरोबा देवस्थान प्राण प्रतिष्ठापना व भेट सोहळ्यास आज आम्ही उपस्थित आहोत,
आम्ही ही महालिंगरायाना साकडे घालतो, तसेच या देवस्तानास ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,या भागाचा कायमचा दुष्काळ हटवा,
या भागातील जमिनीला हिरवा शालू घालण्यासाठी आम्हाला शक्ती मिळो, नक्कीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा प्रश्न मार्गी लावण्यास आम्ही कुठे कमी पडणार नाही असा विश्वास आमदार आवताडे यांनी यावेळी दाखविला.
यावेळी माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, श्री महालिंगराया, श्री बिरोबा देवस्थान आपले आराध्य दैवत आहे, आपण सर्वांनी या कोरोनावर मात करून पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न करतोय,
महालिंगराया चा भंडारा,उधळू,कपाळी लावून आपल्या प्रश्नासाठी प्रयत्न करू यात, आपणास हत्तीचं बळ देणारा आमदार लाभला आहे, नक्कीच या आमदारांच्या माध्यमातून या भागाचा विकास होईल,
गेल्या पंचवीस वर्षात आम्ही काही करू शकलो नाही,ते आमदार समाधान अवताडे करतील असा विश्वास प्रा.ढोबळे यांनी भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला,
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी सभापती प्रदीप खांडेकर,सभापती सुधाकर मासाळ, डॉ.प्रणिती भालके, दामाजीचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी,
संचालक सचिन शिवशरण, विजय माने, माजी उपसभापती शिवाजी पटाप,राष्ट्रवादीचे बसवराज पाटील, गोविंद भोरकडे, फिरोज मुलाणी,एम डी माळी,
सरपंच पुष्पा बने, मल्लिकार्जुन बने, माजी सरपंच संभाजी कुलकर्णी, महादेव शिंदे,नागेश कलशेट्टी, संतोष सोमुत्ते, यांच्यासह सोड्डी,
शिवणगी, येळगी, आसबेवाडी, हुलजंती यासह आधी गावचे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामदैवत बिरोबा देवस्थान व महालिंगराया देवस्थान मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व भेट सोहळा मोठ्या उत्साहात भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून,उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, आमदार समाधान अवताडे यांचा समस्त शिवणगी ग्रामस्थांच्यावतीने भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला.
श्री महालिंगराया श्री बिरोबा देवस्थान मूर्तीची हत्तीवरून गावातून मिरवणूक काढण्यात आली, वाजत-गाजत भंडाऱ्याची उधळण व 125 महिलांनी सवाशीन या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी तर सूत्रसंचालन सदाशिव केंगार यांनी केले, प्रचंड उत्साहात मूर्ती प्राण प्रतिष्ठापणेला शिवणगी नगरीत यात्रा भरली होती.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज