टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त सुत मिल कार्यस्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुनिल कमते यांनी दिली आहे.
आज रविवार दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता स्पिनर्समधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत कामगारांचा सत्कार,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या कार्यक्रम रक्तपुरवठा अनुषंगाने सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत रक्तदान शिबीर,
दुपारी २.०० ते ५.०० पर्यंत आरोग्य तपासणी शिबीर, सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत अन्नदान वाटप आणि दुपारी १२.०० वाजता पंढरपूर येथील पालवी अनाथ संस्था येथे मिष्टान्न भोजन असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तरी वरील सर्व कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजक समितीने केले आहे.
शब्दाला जागणारा लोकप्रतिनिधी : आ.समाधान आवताडे
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सामान्य कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी द्यावी ही भूमिका कायम ठेवल्यामुळे तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बहुमतात असल्याचा दावा करीत आ.आवताडे यांची गरज नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या बोलून दाखविले.
परंतु अंतिम समयी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी बहुमतासाठी संख्याबळ कमी पडताच दोन्ही पदाचे आश्वासन दिले गेले.
परंतु समाधान आवताडे यांनी आपला शब्द उपाध्यक्षपदासाठी दिला असल्यामुळे आपण तुमच्या बरोबर येऊ शकत नसल्याची रोखठोक भूमिका मांडताच दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मध्यस्थीची गळ घातली.
त्यावेळी त्यांनी आपण त्यांना शब्द दिला आहे त्या शब्दाला ठाम आहे. त्यामुळे दिलेला शब्द बदलण्यासाठी देखील आ . आवताडे यांच्यावर दबाव आणला गेला परंतु दिलेल्या शब्दाखातर त्यांनी हा दबाव झुगारत भाजपा समविचारी गटाला मदत करत
जिल्ह्याच्या राजकारणात आपण दखलपात्र असल्याचे दाखवून देताना दिलेल्या शब्दालाच महत्व देतो हे त्यांनी दाखवून दिले.
पंचायत राज व्यवस्थेच्या स्थापनेनंतर मंगळवेढयातून जाणकार उच्च शिक्षित आमदार व्हावा ही भूमीका मांडून देखील महत्वाची क्षणी विजयापासून दूर गेले.
पण पराभव स्विकारुन घरात बसेल तो नेता कसला पराभवातून काहीतरी शिकावे ही भूमिका मनात ठेवून २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या पराभवातून बोध घेवून सामोरे गेलेल्या दामाजी साखर कारखान्याच्या निवडणूकीत सर्वच जागा आ.समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली जिंकून आपल्या राजकीय नेतृत्वाला प्रारंभ केला.
त्यात उमेदवारी देताना उपाध्यक्ष आंबादास कुलकर्णी व संचालक सचिन शिवशरण यांच्या प्रथम न्याय दिला.
कारखान्यात काटकसरीचा कारभार करताना अनेक अडचणीला समोरे जावे लागत असताना अनावश्यक खर्चाला फाटा देखील दिला.
कारखानदारी अडचणीत असताना देखील १० रु किलो दराने साखर देत सभासदांना वचननाम्यात दिलेल्या आश्वासनाची पुर्ती केली. इतर प्रकल्प उभारणीसाठी त्याचे प्रयत्न सुरु आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत पंचायत समितीवर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर सभापतीपदाची संधी देताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा जात पात व पाठीमागे राजकीय पाठबळ आहे का याचा विचार न करता सभापती पदावर काम करण्याची पहिल्यांदाच संधी दिली.
सभापती म्हणून काम करताना अनेक शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्याचा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना कार्यालयात ग्रामीण भागातून येणाय्रा जनतेला सन्मान देण्याचे काम केले.
प्रधानमंत्री आवास योजनेतील उदिष्ठपुर्ती असो, निर्मल भारत अभियान, कृषी, दलित वस्ती सुधार योजनेचा निधी, महिला बालकल्याणच्या योजनेचा लाभ मिळवून दिला.
शिवाय घरकुल योजनेतून वंचीत असलेल्या लाभार्थ्याला योजनेतून जिल्हयात इतर तालुक्याच्या तुलनेत मंगळवेढयातील सर्वात लाभार्थ्यांचा समावेश केला.
तर शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवत तालुक्याचा शैक्षणिक क्षेत्रात दबदबा वाढविला आ.समाधान आवताडे यांनी दिलेल्या संधीमुळे तत्कालीन समाजकल्याण सभापती शिला शिवशरण यांच्या माध्यमातून तालुक्याला सर्वाधिक निधी आ.समाधान आवताडे यांच्या सुचनेनुसार मिळविला.
तालुक्याला निधी मिळविण्याची परंपरा उपाध्यक्ष दिलीप चव्हाण सभापती प्रेरणा मासाळ यांच्या प्रयत्नातून सुरु आहे.
अडीच वर्षाच्या काळात चांगले काम केल्यामुळे आ.समाधान आवताडे यांना २०१ ९ विधानसभा निवडणूकीत त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली तर झालेल्या पोटनिवडणूकीतही जनतेने त्यांच्या नेतृत्वाखाली जि. प व पं. स च्या माध्यमातून झालेल्या विकासकामाचा विचार केल्यामुळे त्याचा लाभ विजयी होण्यात झाला.
उर्वरित तालुक्यातील रस्ते , आरोग्य , शिक्षण , बेरोजगारी , शेतीचे पाणी या प्रश्नासाठी त्यांचा पाठपुरावा सुरु आहे.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, ना . रावसाहेब दानवे अन्य केंद्रीय मंत्रालयाकडे मतदारसंघातील प्रश्नासाठी धाव घेणारे पहिले आमदार ठरताना त्यांचा पाठपुरावा करण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज