टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील अठरा घोटाळ्यांची प्रकरणे आपल्याकडे आली आहेत . या सर्व घोटाळ्यांचा पाठपुरावा आपण करणार आहे. जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळविले आहे.
सांगोला तालुक्यातील पाणीप्रश्न, कारखान्याच्या प्रकरणाबाबत आपण आजच माहिती घेतली आहे.
या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून याचीही चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सांगोल्यात भाजप पदाधिकारी , कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत चव्हाण , भाजप किसान मोर्चाचे कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख , प्रदेश सदस्या राजश्री नागणे , शिवाजीराव गायकवाड , भाजप मोर्चा जिल्हाध्यक्ष धनश्री खटके – पाटील , ओबीसी सेलच्या माया माने , माजी सभापती संभाजी आलदर , पंढरपूर तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे ,
तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार , शहराध्यक्ष आनंद फाटे , डॉ . परेश खंडागळे आदी उपस्थित होते . आता क्रांतीची सुरुवात झाली आहे . महाराष्ट्रातील जनतेला जागृत करण्याचे काम भाजप करत आहे. हजारो कोटींचे घोटाळे करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम ठाकरे सरकार करत आहे
हे सरकार की माफिया महाराष्ट्रातील अनेक मंत्री सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत . ठाकरे सरकारचे माजी गृहमंत्री फरार आहेत , कमिशनर परदेशात गेले आहेत , पोलीस अधिकारी अटकेत आहेत .
हे सरकार आहे की माफिया ? असा प्रश्न करून अनेक नेत्यांनी कारखाने लुटण्याचे काम केले . यासंदर्भातही आपण आवाज उठवत सांगितले . असून पुरावे सादर करत आहोत , असे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज