देवानंद पासले । सोलापूर
ओझेवाडी वि.का.से.सोसायटी ओझेवाडी ही सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चळे शाखेशी संलग्न असून या संस्थेद्वारे 110 सभासद शेतकऱ्यांना एक कोटी तीस लाखाचे ऊस पीक कर्ज वाटप केले.
ही संस्था प्रत्येक वर्षी सर्व सभासदांना दिवाळीमध्ये 10 टक्के लाभांश वाटप करते. आणि याही वर्षी दहा टक्के लाभांश संस्थेने जाहीर केलेला आहे. दिवाळीच्या तोंडावर पीक कर्ज वाटप केल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही अगदी आनंदात साजरी होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले मार्गदर्शन व सहकार्यामुळे या संस्थेची 32 लाखाची ठेव, चालू वर्षी साडेपाच लाख रुपये नफा,
संस्थेचे बँकेत असलेले पंधरा लाखाचे शेअर्स, 22 लाखाचा रिझर्व फंड,संस्थेचे भाग भांडवल 40 लाख, तसेच प्रत्येक वर्षी ऑडिट वर्ग ब, संस्थेचा N.P.A झिरो टक्के,C.R.A.R सुद्धा चांगल्या प्रकारे आहे.अशी आर्थिक परिस्थिती असणारी अशी एकमेव संस्था ओझेवाडी व ओझेवाडी परिसरामध्ये आहे.
बँकेचे प्रशासक शैलेश कोथिंबिरे, सीनियर इन्स्पेक्टर देशपांडे साहेब, व पंढरपूर सहाय्यक निबंध एस यम तांदळे यांनी संस्थेला वेळोवेळी भेटी देऊन संस्थेचे अभिनंदन केले.
परंतु येथील काही संस्थेच्या हितावर बाधा आणणारे लोक नाहक तक्रारी घेतात व संस्थेला बदनाम करणारे कृत्य करतात तरी अशा लोकांवर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
या संस्थेच्या शेतकरी सभासदांनी सचिव चेअरमन अभिनंदन केले आहे. कारण ही संस्था शेतकऱ्याच्या निगडीत काम करत आहे. अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी नवनाथ पाटोळे यांनी दिली आहे.
संपूर्ण जगावर आलेल्या कोरूना सारख्या महाभयंकर रोगाचा सामना करीत असताना ओझेवाडी सारख्या संस्थांनी शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार पीक कर्ज वाटप करून त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपलब्ध करून दिला आहे.
त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मुरा जातीच्या म्हशी,संकरित गाय, शेळीपालन कुकुट पालन इत्यादी छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले.पूर्वी ज्या ठिकाणी दूध संकलन फक्त खूप कमी प्रमाणात व्हायचे त्याठिकाणी आता दररोज दोन हजार लिटर संकलन केले जाते.
त्या दुधाच्या पैशावर शेतकऱ्यांचा कुटुंबाचा खर्च,मुलांची शैक्षणिक फी,घरातील छोटे मोठे आजार यावर खर्च केला जातो असे सोसायटीचे चेअरमन मारुती गायकवाड यांनी सांगितले.
ओझेवाडी वि.से.सह.संस्थेचे कामकाज अगदी व्यवस्थित व सुरळीत सुरू
सोलापूर जिल्ह्याचे आमदार यांच्या व व पंढरपूर पंचायत समितीचे उपसभापती राजश्रीताई भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ओझेवाडी वि.से.सह.संस्थेचे कामकाज अगदी व्यवस्थित व सुरळीत सुरू आहे.त्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्ज वाटप केल्यामुळे संस्थेचे सेक्रेटरी नवनाथ पाटोळे,चेअरमन व संचालक मंडळ यांचे आभार मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज