टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सज्जड दम दिला असून तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात.
पातळी राखून बाेला, असा सल्ला बरडे यांनी देशमुख यांना प्रेमाने दिला आहे. बरडे-देशमुख यांच्यातील फोन संभाषण सोशल मीडियावर सध्या चांगले चर्चेत आहे.
बुधवारी सोलापुरात भाजपच्या वतीने पूनम गेट येथे ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केले होते. यावेळी शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजपच्याकडून करण्यात आला होता. यावरून संतापलेले जिल्हा प्रमुख बरडे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांना फोनवरून सज्जड दम दिला आहे.
काय म्हणाले बरडे?
बरडे म्हणाले, देशमुख यांना सांगितले की, तूम्ही सोलापुरात येवून माझे दैवत उध्दव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचे केले आहे.
तुम्हाला मागेही सांगितले होते की, तुम्ही एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहात तूम्ही जिल्याच्या नेतृत्वाला काहीही बोला. तूमचे नेते मोदी, फडणवीस आहेत. आम्ही बोलत नाही. तुमच्या पक्षाचे नेते सांगतात की, जाळण्यासाठी पुतळा आणला आहे. तुम्ही काय केले मी काय केले हे सांगण्यासाठी तुम्हाला फोन केलेला नाही. तुम्ही उध्दवसाहेबांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. याला तूमच्या गावात येवून मी प्रतिउत्तर देईन.
देशमुखांनी दिले राणेंचे उदाहरण
शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना सज्जड दम दिल्यानंतर प्रतिउत्तर देताना देशमुख म्हणाले, शिवसनेने भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन केल्याचे उदाहरण दिले. यावर बरडे यांनी सुनावले की, राणे काय भाजपचे नेते आहेत का ? शिवसेना, काँग्रेसमध्ये त्यांनी किती वर्षे घालवली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज