सांगोला । प्रतिनिधी पत्नीने बदनामी केल्याने एका तरुणाने आई – वडिलांना उद्देशून चिठ्ठी लिहून विषारी रसायन प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार पुढे आला आहे. सचिन बाळू गावडे ( वय ३० ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना बुधवार २ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० च्या सुमारास वाकी शिवणे येथील सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागे उघडकीस आली आहे.
एका महिले बरोवर अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून पत्नी सोडचिठ्ठी देण्याबाबत त्रास देत होती. तसेच नातेवाईकांनी केलेल्या बदनामीला कंटाळून सचिन बाळू गावडे रा.वाकी घेरडी ता.सांगोला याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयत मुलाच्या आईने सुनेसह अन्य तीन जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हारुबाई बाळू गावडे रा. वाकी घेरडी ता.सांगोला यांचा मुलगा सचिन बाळू गावडे याची पत्नी पुनम ही वारंवार सचिन याचे एका महिले बरोबर अनैतिक संबंध असल्याचा विनाकारण संशय घेऊन सचिन बरोबर भांडण काढून उलट-सुलट बोलून अपमानित करून त्यास वारंवार सोडचिठ्ठी देण्याबाबत वाद घालून त्रास देत होती.
तसेच त्यांचे नातेवाईक शत्रुघ्न दादासो लवटे, अलका शत्रुघ्न लवटे व निलाबाई रामचंद्र लवटे सर्व रा.वाकी घेरडी हे हारुबाई गावडे यांचा मुलगा सचिन याचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध आहेत असे पूनमच्या मनात एकसारखे भरवून तिला फूस लावत होते.
तसेच त्यांनी इतर नातेवाईकांमध्ये सचिन व महिलेच्या अनैतिक संबंधाबाबत बदनामी केली होती. याचा त्रास सचिनला होत असल्याने तो मानसिक टेन्शनमध्ये होता. वरील त्रासास कंटाळून सचिन याने वाकी शिवणे येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पाठीमागील शिवारातील वनविभागाच्या फॉरेस्टमध्ये जाऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी सचिन गावडे त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या आहेत. आत्महत्येपूर्वी सचिन याने चिठ्ठीत आई-दादा मला माफ करा, आयुष्यात काही गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या, पण त्यात अपयश आले आज जे मी काही करतोय त्यास माझी बायको पुनम ही जबाबदार असून तिने माझे आयुष्य पूर्णपणे खराब करून टाकले आहे. शत्रुघ्न दादासो लवटे, अलका शत्रुघ्न लवटे, निलाबाई रामचंद्र लवटे हे सगळे यात सामील आहेत असा उल्लेख चिठ्ठीत केला आहे.
मयत सचिन याच्या मृत्यूस पत्नी पूनम व वरील लोक जबाबदार असल्याबाबत हारुबाई बाळू गावडे यांनी वरील चार जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Sangola waki gherdi Husband commits suicide out of boredom, crime against four including wife; Sangola
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज