टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात ऑगस्ट अखेर पहिला डोस ३१ हजार १८६ तर दुसरा डोस १४ हजार ९ ३१ जणांना देण्यात आल्याने एकूण ४६ हजार ११७ लोकांचे लसीकरण आरोग्य विभागाकडून पूर्ण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
कोरोना संसर्ग साथीने मागील दीड वर्षापासून देशभरात व राज्यात थैमान घातल्याने अनेक वृध्द , तरूण यामध्ये बळी पडले आहेत.
या साथीला रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक नागरिकाने कोविड लस घेण्याचे आवाहन केले होते.
सुरुवातीला लस घेणेबाबत नागरिकांची उदासीनता होती.मात्र मध्यंतरी कोरोनामुळे तरूण युवक या आजाराला बळी पडल्याने या लसीचे महत्व पटल्यामुळे लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर सकाळी ६.०० पासून लांबलचक रांगा लागत असल्याचे चित्र होते.
मंगळवेढा तालुक्यात ऑगस्ट अखेर ४६ हजार ११७ जणांना कोविड लस देण्यात आली आहे.यामध्ये ३१ हजार १८६ पहिला डोस तर १४ हजार ९ ३१ दुसरा डोस देण्यात आला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लस दिलेली आकडेवारी –
मरवडे कोविशिल्ड ९३५० कोवॅक्सिन १०२७ , आंधळगाव -कोविशिल्ड- १०७३० , भोसे – कोविशिल्ड १०६६३ , सलगर- कोविशिल्ड ४४०० , बोराळे कोविशिल्ड -८६३२ , कोवॅक्सिन -१३१३ असे लसीकरण करण्यात आले आहे.
मंगळवेढा तालुक्याला पहिल्यांदाच ३७७० इतकी लस मिळाल्याने मोठया प्रमाणात लसीकरण झाले आहे. उर्वरीत लोकांना भविष्यातही लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज