टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी लोकवर्गणीतून करण्यात येणार असून त्यासाठी सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी 1 लाखांची देणगी दिली आहे.
मंगळवेढा शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना , सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे यांच्या प्रयत्नाने मंगळवेढ्यात महापुरुषांच्या पुतळ्यांची उभारणी लोकवर्गणीतून करण्यात येणार असून
सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांचेकडून मंगळवेढ्यात शहरातील शिवप्रेमी चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी 1 लाख रूपयांचा निधी समितीकडे देण्यात आला.
याप्रसंगी पक्षनेते अजित जगताप,गौरीशंकर बुरकुल,नगरसेवक राहुल सावंजी,प्रवीण खवतोडे, सोमनाथ बुरजे, दिलीप जाधव,सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष माऊली कोंडूभैरी,संभाजी घुले, हर्षद डोरले, नागेश भगरे,सचिन साळुंखे आदी उपस्थित होते.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासूनची शिवरायांच्या पुतळ्याची मागणी लवकरच पूर्णत्वास येणार असून सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या या दातृत्वामुळे पुतळा बसवण्याचे काम आणखी वेगात सुरू होण्यास मदत होणार आहे. सदर पुतळे करण्याचे काम पुण्यातील सुप्रसिद्ध मूर्तिकार महेंद्र धोकटे यांना दिले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज