टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा रहावा, ही जनभावना आहे. त्या आस्थेच्या मागणीला घेऊन सर्वपक्षीय हात पुढे सरसावले आहेत.
खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांनी या प्रेरक कार्यासाठी १ लाख रुपयांचा निधी देऊन जनभावनेचा सन्मान केला. यावेळी त्यांनी या कार्याला आपल्या शुभेच्छा ही दिल्या.
राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक (पुतळा) उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहर व परिसरातील अनेक शिवराय प्रेमी या कामासाठी प्रयत्नरत आहेत.
याचाच एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी शिवाजी महाराज स्मारक मंडळाची नोंदणी करण्यात आली. या मंडळांमध्ये सर्वपक्षीय व सामाजिक – राजकीय क्षेत्रात काम करणारे विविध कार्यकर्ते यांना सामावून घेण्यात आले.
यानंतर तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना भेटून स्मारका बद्दल चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले. स्मारकाची जागा, त्यासाठी निधीची तरतूद करणे अशा प्राथमिक गोष्टीसाठी चर्चा करण्यासाठी मान्यवरांच्या भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सिध्देश्वर आवताडे यांनी संकल्पनेचे स्वागत करून स्मारकाच्या उभारणीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये तसेच ठरलेल्या वेळेमध्ये स्मारक निर्माण व्हावे असा मानस व्यक्त केला.
यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत व्यक्तिगत १ लाख हजार रुपये देणगी देत सर्वांचा उत्साह वाढविला. यापुढे सुध्दा मदत करण्याचे आश्वासन सिध्देश्वर आवताडे यांनी दिले.
पुतळा उभारणीचा मार्ग सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते, सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक यांच्या मदतीने निश्चितपणे लवकरच पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा अजित जगताप यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष माऊली कोंडूभैरी,उद्योजक सोमनाथ बुरजे,नगरसेवक राहुल सावंजी,हर्षद डोरले,सचिन साळुंखे,प्रशांत ढगे,संभाजी घुले आदीजन उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज