टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथे तुंबलेल्या गटाराचे पूजन मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथे सांगोला नाका येथून सुरू झालेली मेन गटार लाईन बेरड गल्ली येथे कायम तुंबलेली असते. या गटाराचे पूजन करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.
सदरील गटार लाईन ही शहराची मुख्य लाईन आहे. गेली अनेक वर्षांपासून सदरील गटाराचे कोणतेच बांधीव काम झाले नसल्याने बऱ्याच ठिकाणी या लाईन मध्ये पडझड झाली आहे.
वारंवार निवेदन देऊन देखील नगरपरिषद याकडे दुर्लक्ष करत अली आहे . प्रत्येक वेळी वर वरची घाण काढून नेले जाते पण पूर्ण गटार साफ केली जात नाही.यावेळी गटारीला हार घालून नारळ फोडण्यात आला.
नगरपालिका च्या नावाने बोम्बा मारून निषेध घोषणाबाजी देखील करण्यात आली. आंदोलनावेळी शशिकांत चव्हाण म्हणाले, सध्या कोरोना सारखा रोग आहे त्यातच आता डेंगू, मलेरिया देखील बळावत आहे.
शहरातील गटारी साफ झाल्या पाहिजेत हे वारंवार सांगून देखील कोणी लक्ष देत नाही. सांगोला नाका ते बोराळे नाका ही मेन गटार लाईन असून याच्या आसपास हजारो घरे आहेत, याची काळजी नगरपरिषदेला अजिबात नाही.
नगरपरिषद फक्त बगीचाकरण करण्यात व्यस्त आहे. गटारीचे पूजन करून रोगराईला निमंत्रण देण्याकरता हे आंदोलन करण्यात येत आहे. या परिसरातील नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागले तर यास नगरपरिषद जवाबदार असेल. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तसेच हे आंदोलन आता गांधीगिरी मार्गाने करत आहोत पण आता देखील याची दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन नगरपरिषद मध्ये करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्थानी यांनी दिला आहे .
या आंदोलनास भाजपा जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, लोकसभा समन्वयक सुदर्शन यादव , शहराध्यक्ष सुशांत हजारे , युवक नेते अमोल पवार , नितीन देवकर , अजित लेंडवे, सतीश मुदगुल , बिरुदेव चव्हाण, विजय चव्हाण , आकाश मंडले,आकाश मंडले,भय्या मंडले, शिवाजी बोडरे,विशाल मंडले,विक्रम मंडले,मल्हारी चव्हाण, समाधान चव्हाण, प्रशांत शिरसागर,सुरज कांबळे,रामा मंडले,नागेश मंडले,लक्ष्मण मंडले परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज