टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे गावामध्ये लोखंडे वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात रात्री ९ च्या आसपास वाघ दिसून आल्याच्या अफवेने खळबळ उडाली असून रेड्डे व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, संबंधित वन अधिकारी यांना माहिती देऊन रात्री साडेबारा वाजता अधिकारी त्या परिसरात येऊन त्या प्राण्याचे रस्त्यावरील ठसे पाहिले आहेत.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठसे तपासले असता त्यांनी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून दिले आहेत.
यावेळी वन विभागाचे काशीद, पोकळे यांनी त्याठिकाणी येऊन पाहणी केली आहे.घटनेची माहिती कळताच गावचे प्रथम नागरिक संजय कोळेकर यांनीही त्या वाडीवर जाऊन नागरिकांना आधार देऊन काळजी घेण्याचे आवाहन केले.
वनविभागामार्फत त्या प्राण्याचा शोध घेण्यासाठी आजू बाजूच्या परिसरात शोध घेतला जाणार आहे.
रड्डे परिसरात वाघ आढळल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली असून या परिसरात तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये या अफवेने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता वनविभागाकडून नागरिकांना दिसलेल्या त्या प्राण्याचा शोध घेण्यासाठी या परिसरात शोध मोहीम राबवली जाणार आहे.
तो वाघ नसून तरसच : वनाधिकारी बुरुंगले
रड्डे परिसरात वनाधिकारी बुरुंगले आपल्या टीमसह आज गस्त घालणार आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, रड्डे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना वाघ किंवा तरस निदर्शनास आल्याची माहिती मिळाली.
यानंतर त्यांनी या ठिकाणच्या जागी आठळलेल्या जनावरांच्या पायाचे ठसे घेतले आहेत. ते आपल्या वरिष्ठांना पाठवून तपास केला असता, हे ठसे वाघा सारख्या दिसणाऱ्या तरस जनावराचे असल्याची महिती मिळाली आहे.
त्यामुळे नागरिकांनी वाघ दिसल्याच्या अफवेला न घाबरण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. मात्र तरीही उपाययोजनेचा भाग म्हणून या परिसरात शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज