टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांगली , सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागात पूरात अडकलेल्या नागरिकांसाठी आवश्यक ती मदत बहुजन रयत परिषद पाठवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे , महिला प्रदेशाध्यक्षा ॲड.कोमल साळुखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्रा.लक्ष्मणरावढोबळे , गालफाडे , साळुखे यांच्या नेतृत्वाखाली १८ जुलै ते ५ सप्टेंबर दरम्यान या संवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदूरबार या ठिकाणी संवाद अभियानाला सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यातील पुणे विभागाच्या अभियानाची सुरुवात सोलापूरातून झाली. पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद झाली.
सोलापूरात या अभियानाची सुरुवात होईल मात्र पुढे सांगली , सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाल्याने पुण्यात या अभियानाचा समारोप करणार आहे.
मात्र चिपळूण , सांगली , कोल्हापूर येथे पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी मदत बहुजन रयत परिषद पाठवणार असल्याचे साळुखे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज