टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात सातत्याने विज पुरवठा खंडीत होत असल्याने याचा त्रास नागरिक,व्यवसायिक,शेतकरी यांना होत असल्याने सर्वच स्तरातून विज वितरणच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून यात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
मंगळवेढा शहरात दिवसा व रात्रीही वारंवार विज पुरवठा खंडीत होत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर,शालेय विदयार्थ्यांवर,उद्योगधंदे व शेती उद्योग यावर होत आहे.
सध्या पावसाळयाचे दिवस असतानाही विज वितरण कंपनीचे अधिकारी सुस्थितीत विज पुरवठा देण्यात अपयशी ठरत आहेत.उन्हाळयामध्ये विजेची मागणी वाढते परिणामी विज पुरवठा खंडीत होतो. हे उन्हाळयात नागरिक समजून घेवू शकतात.
मात्र पावसाळयातही सातत्याने विज पुरवठा बंद पडत असल्याने विज वितरणचा ढिसाळ कारभार जनतेच्या समोर येत आहे.विज गेल्यानंतर नागरिक याबाबत विज वितरणच्या कार्यालयात ऑपरेटरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात मात्र तेथील फोन उचलला जात नाही.
परिणामी नागरिकांना कार्यालयाकडून अपेक्षित उत्तर मिळू शकत नसल्याने तेथील टेलिफोन सेवा शो चे साधन बनू पहात आहे. विज वितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी नेमणूकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना येथे विज गायब झाल्यानंतर त्या अधिकार्यांनाही पत्ता नसतो.
परिणामी याची शिक्षा नागरिकांना मिळत असल्याचा बोलबाला सुरु आहे. वरिष्ठ अधिकारीच येथे निवासी रहात नसल्यामुळे कामाची ऐसीतैसी सुरु असल्याच्या तक्रारी आहेत.
सोलापूरचे अधिक्षक अभियंता यांनी याकामी लक्ष घालून येथील अधिकार्यांना सक्त ताकिद देवून मंगळवेढा शहरातील विज पुरवठा खंडीत होणार नाही याबाबतच्या सूचना देवून विज सेवा सुरळीत दयावी अशी मागणी होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज