टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल रविवारी मंगळवेढा मुक्कामी आले आहेत. आज २६ जुलैच्या रात्री ते परत जाणार आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम आमदार समाधान आवताडे यांच्या फार्महाऊसवर होता.
हा दौरा कौटुंबिक असून आपल्या घरी सदिच्छा भेट देत असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
मंगळवेढा भेटीत आगामी सोलापूर महानगरपालिका, विधान परिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका, दामाजी कारखाना निवडणुका पाहता राजकीय समीकरणावर चर्चेची शक्यता आहे.
पंढरपूर विधानसभेची जागा जिंकल्यापासून राज्यातील भाजप नेत्यांचा पुढील विधानसभा निवडणुकीबाबत आत्मविश्वास वाढला आहे. तिन्ही पक्ष एकत्र असतानाही जागा भाजपने खेचून आणल्याने मतदारांचा महाविकास आघाडीवर रोष आहे.
ही आघाडी मान्य नसल्याचा दावा भाजप नेते राज्यभर करीत आहेत. त्या अनुषंगाने आ.प्रशांत परिचारक यांचे योगदान व त्यागामुळे ही जागा भाजपला जिंकता आली.
आता थोड्या दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्याची मोर्चेबांधणी या दोन दिवसांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
आ.प्रशांत परिचारक यांच्या सल्ल्याने इतर पक्षांची वाढती शक्ती रोखण्याचे व त्यांना निष्प्रभ करण्याचे डावपेचही आखले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज