mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय; टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 19, 2021
in राष्ट्रीय
भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय; टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात आला.

या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 घावांचे लक्ष्य दिले होते.

भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य 7 गडी आणि 80 चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (86) आणि इशान किशनच्या (59) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले.

तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 31 धावा करत भारताला विजय लक्ष्य साध्य करुन देण्यात स्वतःचं योगदान दिलं.

तत्पूर्वी या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत एका संयमी खेळीच्या जोरावर 262 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. ज्यामुळे भारतासमोर 263 धावांचे लक्ष्य होते. सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी करत श्रीलंकेची वरची फळी नेस्तनाबूत केली.

पण कर्णधार शनाका (39) याची उत्कृष्ट खेळी सोबत करुनारत्ने याने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडत केलेल्या नाबाद 43 धावा यामुळे श्रीलंका संघाने 262 धावांपर्यंत मजल मारली होती.

भारताकडून युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि दिपक चाहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल पंड्या बंधूंनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

कोलंबोच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संधी दिली. यामध्ये बऱ्याच काळानंतर भारताची ‘कुल्चा’ अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची जोडी मैदानात अवतरली होती.

भारतीय संघाचा तीन फिरकीपटू खेळवण्याचा प्लॅन यशस्वी झाला. कारण सामन्यात पहिले महत्त्वाचे चार फलंदाज फिरकीपटूनीच बाद केले. दरम्यान संपूर्ण सामन्याचा विचार करता चहल, कुलदीप यादव आणि दिपक चहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

श्रीलंकेचे गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरल्याचे आजच्या सामन्यात पाहायला मिळाले. सलामीवीर पृथ्वी शॉ (9 चौकारांच्या सहाय्याने 43 धावा) आणि इशान किशन (8 चौकार आणि 2 षटकारांसह 59 धावा) या दोघांनी लंकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

दुसऱ्या बाजूला कर्णधार शिखर धवनने संयमी 86 धावांची खेळी करत भारताला पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून दिला

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत विजयी

संबंधित बातम्या

मी मटण खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? सुप्रिया सुळेंच विधान चर्चेत; सत्ताधाऱ्यांवर केली ‘ही’ सडकून टीका

मोठी बातमी! सुप्रिया सुळे केंद्रात, रोहित पवार राज्यात मंत्री होणार? पवार गट NDAमध्ये जाणार? ताईंनी थेट सांगितलं

January 10, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बाबो..! ‘मी कोणतीही टक्केवारी खाणार नाही’, उमेदवाराचं नाद खुळा शपथपत्र; गावभर चर्चा; स्टॅम्पवर दिलेल्या शपथपत्रात काय नमूद केले?

January 10, 2026
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

मोठी संधी! शासकीय सेवेत अग्निविर जवानांना नोकरी देणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

January 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कामाची बातमी! एकदा आरक्षणाचा फायदा घेतला तर खुल्या गटातील जागेवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

January 16, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 8, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा! राज्य सरकारला दणका; अखेर ‘ते’ परिपत्रक केलं रद्द

December 25, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! शाळेत पळताना घसरला अन् हातातली टोकाची पेन्सिल घशात घुसली; UKG च्या चिमुकल्याचा मृत्यू

December 27, 2025
धक्कादायक! पिसाळलेला कुत्रा चावल्याने मंगळवेढ्यातील वृद्ध इसमाचा मृत्यू; काळजी घेण्याचे केले आवाहन

दिलासा! भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ‘एवढ्या’ लाखांची भरपाई; सरकारचा मोठा निर्णय

November 22, 2025
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

धक्कादायक! मंगळवेढ्यातील सुपुत्र वीर जवान कर्तव्य बजावत असताना शहिद; उद्या मुळगावी अंत्यसंस्कार केले जाणार

November 19, 2025
Next Post
खळबळ! वाहने अडवून पैसे वसूल करणारा मंगळवेढ्यातील तोतया पोलीस ताब्यात

पंढरपूर शहराला जोडणारे सर्व मार्ग सील; आषाढी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडक संचारबंदी

ताज्या बातम्या

सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक; सुमारे ‘एवढ्या’ हजार मतांनी शालन शिंदे विजयी

सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक; सुमारे ‘एवढ्या’ हजार मतांनी शालन शिंदे विजयी

January 16, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! शाळेत गेल्यानंतर प्रकृती बिघडली, रजा घेऊन घराकडे निघालेल्या शिक्षकावर वाटेतच ‘काळ’ आडवा आला; कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर

January 16, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! कोणत्याही मुद्रांकाशिवाय आता दोन लाखांपर्यतचे कर्ज शेतकऱ्यांना देणे बँकांसाठी असणार बंधनकारक; पीक कर्जासाठी खर्च नाही

January 16, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

इच्छूक उमेदवारांनो..! ZP व पं.स. साठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून; नामनिर्देशन प्रक्रिया ही ‘या’ पद्धतीने राबविली जाणार

January 16, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

झेडपीच्या उमेदवाराला ‘एवढे’ लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

January 15, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बनावट कागदपत्रे व फसवणूक प्रकरण; आरोपीस उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

January 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा