टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्हयात सध्या खत विक्रेते यांच्या कडून , शेतकऱ्यांची लूट चालू असून युरिया ची कृत्रिम टंचाई निर्माण करून दुसरे खत शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे काम चालू असल्याचे दिसत आहे.
फक्त युरिया मागीतला तर तो दिला जात नसून ऊस दराबाबत तेवढे कारखानदार यांना जाब विचारणारे शेतकरी नेते प्रत्यक्ष शेतकरी अडचणीत असताना , खतांची काळ्या बाजारात विक्री चालू असताना , शेतकरी यांची लूटमार होत असताना कुठे आहेत ?
व कृषी विभाग सुस्त कसा आहे ? असा सवालही शेतकरी विचारत आहेत. सध्या पाऊस चालू आहे. शेतकरी खता करीता दुकानदार यांच्याकडे शेतकऱ्यांची उंबरठे झिजवत आहे.
मात्र , दुकानदार यांना त्याची किंमत नाही. सरळ सरळ युरिया बरोबर दुसरी खते १०:२६:२६ किंव्हा १८:४६ घ्या अन्यथा युरिया नाही असे उघडपणे अनेक दुकानदार बोलत असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याचही चर्चा सुरू झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज