मंगळवेढा टाईम्स टीम ।
कोरोना झालेल्या अनेक जणांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी अनेकजण सरसावलेले आपण पाहिले. मात्र निसर्गनिर्मित ऑक्सिजन मिळावा याकरिता वृक्षारोपण हा एकमेव पर्याय आहे.
वृक्षारोपण करताना केवळ शोभेची झाडे लावण्यापेक्षा मुबलक प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आज ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करताना समाधान वाटले असे प्रतिपादन मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर बबनराव आवताडे यांनी केले.
खरेदी विक्री संघाचे तज्ञ संचालक सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्वी उद्योजक विजय भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “एक पाऊल भावी पिढीसाठी” या संकल्पनेतून विजय भोसले मित्र परिवाच्यावतीने कागष्ट येथील मुख्य रस्त्यावर १०० वृक्षरोपांची लागवड आवताडे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी आवताडे बोलत होते. वृक्षारोपणप्रसंगी चेअरमन सिध्देश्वर आवताडे, सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार पाटील, कागष्टचे भावी सरपंच अशोक गंगणे, युवा नेते रणजित जगताप, शांताराम बिराजदार, दादासाहेब काकेकर, सुनील पवार, घमुआण्णा बिराजदार, बंडू भोसले, विठल चौधरी, बंडू भोसले, बालाजी पवार, प्रताप लांडगे,आनंदराव कलुबर्मे,राजु चव्हाण, दिगंबर जाधव,अनिल कांबळे, दीपक जावळे उपस्थित होते.
पुढे बोलताना आवताडे म्हणाले की, माणसांच्या चुकांमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. याचा परिणाम जागतिक तापमान वाढ, ओझोन वायूच्या स्तरामध्ये निर्माण झालेली पोकळी,
नैसर्गिक वादळे, हवामान बदल, इत्यादी गोष्टीत दिसून येतो. यामुळे संपूर्ण सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होत आहे. हे असेच सुरु राहिले तर पुथ्वीवरील जीवनालाही मोठा धोका निर्माण होईल. यातून वाचण्यासाठी पर्यावरण रक्षण व मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.
वृक्षांमुळे आपल्याला अनेक जीवनावश्यक गोष्टींबरोबरच प्राणवायू असलेला ऑक्सिजन मिळतो, असे उद्गार मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर बबनराव आवताडे यांनी काढले.
पर्यावरण रक्षण सर्वांची जबाबदारी : विजय भोसले
दिवसेंदिवस कमी होणारे पावसाचे प्रमाण लक्षात घेता जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
तसेच पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता एक चळवळ बनली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून पर्यावरण रक्षण व वृक्षारोपण करून निसर्गाचे संगोपन केले पाहिजे, असे मत खरेदी विक्री संघाचे तज्ञ संचालक विजय भोसले यांनी व्यक्त केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज