टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौरा होता. या दरम्यान त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी माओवाद्यानी मराठा मोर्चाला दिलेलं पाठिंब्याचं पत्रं म्हणजे ठाकरे सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचं मेटे म्हणाले.
तसेच मराठा आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी सध्या दौऱ्यावर असून २६ जून रोजी औरंगाबाद येथे मेळावा घेणार असल्याचे मेटे यांनी जाहीर केलं.
सोलापूरला देखील जुलैच्या पहिल्या आठवड्यात मेळावा घेण्यात येईल.त्यानंतर ३६ जिल्ह्यात मेळावे घेणार असून विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
२७ जूनला मुंबईला १० हजार बाईकची रॅली काढण्यात येणार असून ५ जुलै पर्यंत सर्व प्रश्न सुटले नाहीत तर ७ जुलै रोजी होणारे अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा मेटे यांनी दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज